आता हेड कॉन्स्टेबल करणार गुन्ह्यांचा तपास : गृहराज्यमंत्री कदम

आता हेड कॉन्स्टेबल करणार गुन्ह्यांचा तपास : गृहराज्यमंत्री कदम.
प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
वाढती गुन्हेगारी ची संख्या, बघता राज्यसरकारने पोलिसांच्या तपासाचे अधिकार बदलले असून, आता हेड कॉन्स्टेबल देखील अनेक गुन्हांचा तपास करणार आहेत. या अगोदर पीएसआय व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तपास असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एकापेक्षा जास्त केसेसचा भार असायचा, अशा विविध कारणांमुळे गुन्ह्याच्या तपासात विलंब होऊन, विशेषत ग्रामीण भागात गुन्ह्याची उकल होण्यास दिरंगाई होत असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आले होते.
या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशाने गृह विभागाने हेड कॉन्स्टेबल यांना छोट्या गुन्ह्यांच्या तपासाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे किरकोळ गुन्हे, साधे भांडण, छोटी चोरी, साधी फसवणूक अशा विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी आणि त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण संबंधितांना देण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी सागितले.
राज्य सरकारने घेतलेल्या, गृह विभागाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने पोलीस दलाच्या एकूणच कार्यक्षमतेत वाढ होण्याचे चित्र दिसत असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळण्यासाठी हा निर्णय निश्चितच परिणामकारक ठरेल, असे मत तज्ज्ञांनी वर्तवले आहे.