अहिल्यानगर शहरातील कापडबाजार येथील पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी, उपस्थित भाविकांना मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप .

अहील्यानगर शहरातील कापडबाजार येथील पंचमुखी महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे वाटप.
महाशिवरात्री हा सण शिवभक्तांसाठी पर्वणी असते. आजचा दिवस भगवान शिवाची आराधना करण्यासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे अहील्यानगर शहरातील कापडबाजार पंचमुखी महादेव मंदिर येथे, मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, यावेळी भाविकांसाठी पंचमुखी महादेव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. सदरील मंदिराची स्थापना 1940 साली करण्यात आली होती, तेव्हापासून आजतगायत मंदिराच्या वतीने महाप्रसादासह वेगवेगळे धार्मिक उपक्रम राबविले जातात अशी माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे .