दलीत विद्यार्थ्याची आत्महत्या: अरमान खत्रीविरोधात अखेर खटला चालणार.

दलीत विद्यार्थ्याची आत्महत्या: अरमान खत्रीविरोधात अखेर खटला चालणार.

दलीत विद्यार्थ्याची आत्महत्या: अरमान खत्रीविरोधात अखेर खटला चालणार.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

मुंबई, ४ जुलै २०२५ – आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणात तब्बल अडीच वर्षांनंतर आरोपी अरमान खत्रीविरोधात सत्र न्यायालयात खटला चालणार आहे. खत्रीने दाखल केलेली गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयात मागे घेतल्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीला मार्ग मोकळा झाला आहे.

उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी

शुक्रवारी, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे अरमानने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी तक्रारदार आणि राज्य सरकारतर्फे तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. तक्रारदारांच्यावतीने अ‍ॅड. संदेश मोरे आणि अ‍ॅड. हितेंद्र गांधी यांनी जोरदार युक्तिवाद करत याचिकेला विरोध दर्शवला. त्यानंतर अरमानच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली, जी न्यायालयाने मंजूर केली.

प्रकरण नेमकं काय आहे?

फेब्रुवारी २०२३ मध्ये आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून दर्शन सोलंकी (वय १८) याने उडी मारून आत्महत्या केली होती. मृत्यूच्या तीन आठवड्यांनंतर, एसआयटीला दर्शनच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली, ज्यात काही गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या होत्या. त्या आधारे तपास करत अरमान खत्रीला अटक करण्यात आली होती.

अरमान खत्रीवर आरोप काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दर्शन सोलंकी दलित समाजातील विद्यार्थी होता. मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी अरमानने जातीवाचक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्याने दर्शनला पेपर कटरने धमकावले होते, असा आरोप तक्रारीत आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील कायदेशीर टप्पा

अरमान खत्रीची याचिका मागे घेतल्याने आता प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू होणार आहे. यासंदर्भात विशेष सरकारी वकील प्रकाश सालसिंगिकर यांनी माहिती दिली.