लोणी खुर्द, दत्तनगर येथे होली मेरी एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यमाने Divine Mercy Home चे उद्घाटन

लोणी खुर्द,  दत्तनगर येथे होली मेरी एज्युकेशन फाउंडेशनच्या  विद्यमाने Divine Mercy Home चे उद्घाटन
लोणी खुर्द,  दत्तनगर येथे होली मेरी एज्युकेशन फाउंडेशनच्या  विद्यमाने Divine Mercy Home चे उद्घाटन
लोणी खुर्द,  दत्तनगर येथे होली मेरी एज्युकेशन फाउंडेशनच्या  विद्यमाने Divine Mercy Home चे उद्घाटन
लोणी खुर्द,  दत्तनगर येथे होली मेरी एज्युकेशन फाउंडेशनच्या  विद्यमाने Divine Mercy Home चे उद्घाटन

आज दि. ११/०९/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता लोणी खुर्द,  दत्तनगर येथे होली मेरी एज्युकेशन फाउंडेशनच्या  विद्यमाने Divine Mercy Home चे उद्घाटन 

मा. श्री. मधुकरराव नवले साहेब ( अध्यक्ष, अभिनव शिक्षण संस्था,अकोले.) यांचे हस्ते फित कापून झाले. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. जनार्दन पाटील घोगरे ( सरपंच लोणी खुर्द ) मा. श्री.बाबा खरात ( समाजसेवक आडे वस्ती) आणि ज्यांनी या डिव्हाइन मर्सी होम साठी सर्व सोयीने परिपुर्ण अशी जागा, ईमारत उपलब्ध करुन दिली ते म्हणजे रेव्ह फा. संजय ब्राह्मणे,औरंगाबाद ( आध्यात्मिक गुरू, सल्लागार Divine Mercy Home )  श्रीमती. अल्फान्सो मॅडम ( प्राचार्या, अभिनव शिक्षण संस्था,अकोले.) मा.श्री. मंडलिक साहेब (प्रशासकीय अधिकारी, अभिनव शिक्षण संस्था,अकोले.) मा. श्री. प्रसाद जाॅन अध्यक्ष डिव्हाइन मर्सी होम व सौ. जेनी जाॅन (सेक्रेटरी ) व मा. श्री अमोल जोशी नाशिक (CSR Consultant ही संस्था रजिस्ट्रेशन करणे व कायदेविषयक बाबी पाहणारे मा. श्री राहुल अनावले तसेच अ॓डव्होकेट मा. श्री. प्रमोद ब्राह्मणे (हायकोर्ट) सपत्नीक उपस्थित होते व इतरही मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचा शाॅल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सन्मान व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सौ. जेनी जाॅन मॅडम यांनी केले.मनोगत व्यक्त करतांना श्री. बाबा खरात साहेबांनी, आपले हात हे उगारण्यासाठी नसुन अनाथांचे जीवन सावरण्यासाठी व उभारण्यासाठी आहे. रेव्ह.फा.संजय ब्राह्मणे यांचे कृतीतून पहावयास मिळते. असे प्रतिपादन केले.फादर संजय यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, कोव्हिड १९ मुळे अनाथ झालेल्या मुलांचे भवितव्य बनवण्यासाठी सध्या मी हे रोपटे लावले आहे . ७ ते ८ वर्षात फारच मोठे होईल. या जागेचा सामाजिक कार्यासाठी उपयोग होऊ लागला ही माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यात मला नातेवाईकांचे फार सहकार्य लाभले. असे उदात्त विचार त्यांनी मांडले. सामाजिक बांधिलकी, अनाथांना मदतीची हात देण्यासाठी विचार करुन हे कार्य हाती घेऊन समाजासाठी काही करण्याची धडपड, शेवटी आपण घेवून काय जातो, जीवन नौका ही समाजाच्या हितासाठी असावी, समाजासाठी उदात्त विचार घेवून जगणाऱ्या मध्ये मा. रेव्ह. फादर संजय आपण आहात, आपण लावलेले ह्या बिजाचा वटवृक्ष होवो याची व्याप्ती वाढत जावो, त्यासाठी आमची मदत राहीलच, चांगल्या भावनेने सुरू केलेलं कामास ईश्वर सहाय्य करत असतो, ईश्वराची आराधना ही रंजले गांजल्यांची सेवा करण्यात धन्यता मानणारे रेव्ह.फादर संजय यांना धन्यवाद देत मा. श्री. मधुकरराव नवले साहेबांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात मा. श्री.जनार्दन पाटील घोगरे यांनी उपस्थितांना उद्बोधक भाषण करतांना या कामासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा राहील, आवश्यक ते सहकार्य आम्ही करु, या कार्यास आम्ही पुढे चालू ठेवू. प्रार्थनेला जोडलेल्या दोन हाता पेक्षा मदतीचा एक हात फारच अनमोल असतो. या चांगल्या कार्यक्रमास मला बोलवल्या बद्दल आयोजकाचे आभार मानून अध्यक्षीय भाषण संपवले. कार्यक्रमाची सांगता ही आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन झाली, यामध्ये उपस्थित महिला यांचे हस्ते फुलझाडांचे रोपण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन   मा.श्री. राजेश माघाडे प्राचार्य, विखे पाटील सैनिकी स्कुल, लोणी व त्यांच्या पत्नी यांनी उत्कृष्ठ प्रकारें करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर मा. श्री. ज्योब जाॅर्ज यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. Reporter BPSLive News.....Prakash Nikale. Shrirampur.