कृषी विद्यापीठातील इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव मोठे लक्षण खोटे,पालकांमध्ये तीव्र नाराजी.

कृषी विद्यापीठातील इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव मोठे लक्षण खोटे,पालकांमध्ये तीव्र नाराजी.

राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठामध्ये गेल्या आठ वर्षांपूर्वी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आले आहे .या स्कूलची चर्चा सीबीएससी पॅटर्न म्हणून तालुक्यात गाजत आहे .उच्चशिक्षित पालकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे म्हणून या शाळेत आपल्या पाल्यांचे ॲडमिशन घेतले .परंतु सब्र का फल मिठा न होता खट्टा झाला . हे सी बी एस सी पॅटर्न स्कूल नसून हे इंग्लिश मीडियम स्कूल आहे हे आता पालकांना कळू लागले आहे .

       विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज आपल्या तक्रारी मांडण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल येथे धाव घेतली .यावेळी शिक्षण मंडळाचे सचिव श्री .महानंद माने हे यावेळी उपस्थित होते .पालकांनी तक्रारीचा पाढा चालू केला असता सचिवांनी याची दखल न घेता उलट तुम्हाला कुठे तक्रार करायची ती करा असे बोलून निघून गेले .संतप्त झालेल्या सर्व पालकांनी विद्यापीठ प्रशासकीय इमारतीमध्ये धाव घेऊन विद्यमान कुलगुरू यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यापीठ कुलगुरू उपस्थित नसल्याने पालकांनी खूपच संताप व्यक्त केला .

      यावेळी राष्ट्रवादीचे तालुका युवा अध्यक्ष श्री . धीरज पानसंबळ यांनी उपस्थित पालकांच्या वतीने माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांना तात्काळ फोन करून सर्व हकीकत सांगितली .येत्या दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे .

        यावेळी उपस्थित महिलांनी शाळेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी विषयी पाढा वाचला .शाळेतील सतत बदलणारे शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व शाळेतील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याला जबाबदार कोण ,अशा तीव्र शब्दात महिलांनी नाराजी व्यक्त केली .शाळा व्यवस्थापन समिती जर तक्रारींची दखल घेत नाही तर पालकांनी तक्रार नोंदवायची कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे .जर आमच्या समस्यांचे निराकरण झाले नाही तर शाळा व्यवस्थापन मंडळाला आमच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल असेही यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले .