विदर्भात वकील आपल्या दारी उपक्रम, १५ दिवस मोफत कायदेशिर सल्ला.

विदर्भात वकील आपल्या दारी उपक्रम, १५ दिवस मोफत कायदेशिर सल्ला.

विदर्भात वकील आपल्या दारी उपक्रम, १५ दिवस मोफत कायदेशिर सल्ला.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

          दर्द से हमदर्द तक ट्रस्ट ही संस्था गेल्या ३ वर्षांपासून गरजूंना मोफत कायदेशिर सल्ला देण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि पुणे शहरात या संस्थेचे कार्य अधिक प्रभावी आहे.

          या संस्थेने 'लीगल ऐड ऑन व्हील्स' ( वकील आपल्या दारी )  या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. त्याच अनुषंगाने लीगल ऐड ऑन व्हील्स हा उपक्रम विदर्भातील अकोल्यातून सुरू झाला आहे. येत्या १५ दिवसांपर्यंत ही गाडी संपूर्ण विदर्भात मोफत सल्ला देत प्रवास करणार आहे. या प्रवासात अँड विभव दिक्षित हे विदर्भ प्रमुख म्हणून काम बघणार आहेत, ज्यांना कोणाला कायदेशिर माहिती - सल्ला हवा असल्यास, त्यांनी ७०३८८९०७२३ या नंबर वर सम्पर्क साधावा असे आवाहन संस्थे मार्फत करण्यात आले आहे.

          श्री संताजी इंग्रजी प्राइमरी स्कूल , बाळापूर नाका अकोला येथे दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे वाहन ‘लीगल ऐड ऑन व्हील्स’ आणण्यात आले आणि वकील आपल्या दारी या उपक्रमात या वस्तीतील अनेक लोकांनी सहभाग नोंदवला.

          प्रामुख्याने या उपक्रमाच्या आयोजनात विद्या भारतीचे महानगर अध्यक्ष आणि संताजी इंग्लिश प्राइमरी स्कूल चे अध्यक्ष मंगेश वानखडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक दर्द से हमदर्द ट्रस्ट चे विदर्भ प्रमुख अँड विभव दिक्षित यांनी केली.

          दर्द से हमदर्द तक ट्रस्ट च्या कार्याची माहिती अँड विघ्नेश्वर सुब्रमण्यम यांनी दिली. लीगल अँड ऑन व्हील्स या उपक्रमाची माहिती अँड संकेत राव यांनी दिली.
बाळुभाऊ लटकुटे, दादाराव खडसने आणि विठ्ठल नांदूरकर यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच जय राणे व महेश कितुकले यांनी आभार मानले. अशी माहिती संस्थे मार्फत उपलब्ध झाली.