स्वातंत्र अमृत महोत्सवाचे सह परिवाराने केले स्वागत,आजही अनेकांना मुलभुत सुविधा मिळत नाही ही मोठी खंत =सुरेशराव लांबे

स्वातंत्र अमृत महोत्सवाचे सह परिवाराने केले स्वागत,आजही अनेकांना मुलभुत सुविधा मिळत नाही ही मोठी खंत =सुरेशराव लांबे

भारत देशाला स्वातंत्र मिळवुन 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पुर्ण होत असल्या कारनाने संपुर्ण देशात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या दरम्यान घर घर झेंडा,हर घर झेंडा, या अमृत महोत्सवी अभियानासाठी शासन व प्रशासन मोठा प्रयत्न करत असुन या अभियानात 87 वर्ष पुर्ण असलेले श्री दत्तात्रय कुशिनाथ लांबे यांनीहीमोठ्या आनंदाने सहभाग घेतला,तसेच पिप्री अवघडच्या माजी सरपंच सौ,मिनाक्षीताई सुरेशराव लांबे, याही सहभागी झाल्या असुन,पिप्री अवघड गावातील व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील लहाना पासुन तर जेष्ठा पर्यत गरीबांन पासुन तर श्रीमंता पर्यत सर्व नागरिकांनी मोठा प्रतीसाद दिला आहे असे माहीती प्रहार जनशक्ती पक्षाचे, राहुरी तालुकाध्यक्ष श्री,सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली,

भारत देश स्वातंत्र्या पुर्वी इंग्रजांच्या ताब्यात होता,भारत देशात

व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी भारतावर बोलताबोलता 150 वर्ष राज्य केले, ते भारतीय नागरिकांना दुय्यम वागनुक देत असत त्यांना काही भारतीयही फितुर झाले होते,आजही फितुरांची संख्या फार मोठी आहे,त्यांचा बंदोबस्त येणा-या काळात सर्व सामान्य मतदार करतील आहे,अशी सडेतोड माहीती लांबे सुरेशराव लांबे यांनी पत्रकात दिली,

इंग्रजांकडुन भारतीय नागरिकांवर होत असलेला हा अन्याय अत्याचार भ्रष्ठाचार,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सहन झाला नाही,व त्यांनी इंग्रजांना चले जाव नारा देत विविध आंदोलन पुकारले व त्या आंदोलनाला बहुजन समाजातील अनेक थोर शुरवीरांनी देशभक्तांनी पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेतला त्यात अनेकांचे बळी गेले ते देशासाठी आपल्यासाठी शहीद झाले परंतु त्यांनी भावी पिढीच्या कल्याणासाठी व विविध विकासासाठी हा लढा यशस्वीपणे लढविला व त्या गोऱ्या इंग्रजांना भारत देशातून हद्दपार करत यश मिळवले

भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवुन दिले व हुकुमशाही मोडीत काढत भारताला लोकशाही राष्ट्र बनवले त्या घटनेला 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पुर्ण होत आहेत म्हणुन आपण सर्व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत,

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवु 75 वर्ष झाली तरी सर्व सामान्य नागरीक कष्ठकरी शेतकरी दिव्यांग अपंग वृद्ध अनाथ यांना आजपर्यत मुलभुत गरजांसाठी या 75 वर्षातील लोकशाही राज्यातील सर्वच राज्यकर्त्यांनी त्यांचे राजकारण केले व सर्व सामान्यांच्या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष करुन सत्ता मिळवली,बहुजन समाजातील गोरगरीबांना आजही मुलभुत गरजा,अन्न वस्त्र निवारा यासाठी अनेक नागरिक प्रतीक्षेत आहेत त्यासाठी त्यांना आजही आपल्या न्याय हक्कासाठी विविध आंदोलने करावी लागतात,आजही इंग्रजापेक्षाही भयानक मंडळी लोकप्रतिनीधी म्हणुन मिरवतात अशा निर्दय प्रस्थापीतांना धडा शिकविन्यासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने दुरदृष्टी ठेऊन गुप्त मतदान पध्दती व सर्वाच्या मताला समान किंमत दिली,तरीही आपल्यातील काही लोक अर्थीक अमिशाला व दबावाला बळी पडतात ही मोठी खंत प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी व्यक्त केली,

 आता तरी केंद्रातील सरकारने व राज्यातील सरकारने बहुजन समाजातील सर्व वंचित घटकांना न्याय द्यावा व लोकांनी लोकांनसाठी चालवलेले राष्ट्र निर्माण करुन खरी लोकशाही आणुन सर्व स्वातंत्र्यवीरांना अपेक्षित राष्ट्र निर्माण करावे ,

भविष्यात प्रहार जनक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा,ना,बच्चुभाऊ कडु यांच्या सारख्या सर्व सामान्य नेत्याच्या मागे खंबीर ऊभे रहान्याची गरज आहे तेच आपल्याला न्याय देतील विनंती पुर्वक मागणी लांबे यांनी केली,

व बहुजन समाज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकाने स्वताच्या घरावर तिरंगा लावुन शासन व प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमाचे पालन करुन देशाचं प्रतीक असलेल्या तिरंगा झेंड्याच पावित्र्य राखुन अमृत महोत्सवाचे मोठ्या आनंदाने साजरा करुन स्वागत करावे व प्रशासनास सहकार्य करावे,

 असे विनम्र आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे यांनी केले,