पाचोरा येथील पत्रकारांवर झालेल्या हल्याचा एकता पत्रकार संघाकडून निषेदाचे पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन.

पाचोरा येथील पत्रकारांवर झालेल्या हल्याचा एकता पत्रकार संघाकडून निषेदाचे पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन.

पाचोरा येथील पत्रकारांवर झालेल्या हल्याचा एकता पत्रकार संघाकडून निषेदाचे तहसीलदारांना निवेदन. 

नेवासा (प्रतिनिधी)

जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भाड्य हल्याचा व त्यांना झालेल्या मारहाणीचा नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने निषेध करत तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरीक्षक शिवाजीरावं डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले 

 

निवेदन देते वेळी एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामान्य माणसाला प्रशासाकिय पातळीवर कुठलाही न्याय न मिळाल्याने तो न्याय पत्रकाराच्या लेखणीतून मिळेल असा विश्वास आहे आणि अश्या पत्रकारांवर हल्ले होणे हि लाजिरवाणी गोष्ट आहे 

 

 

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की पत्रकार संदीप महाजन यांना काही दृष्ट प्रवृत्ती च्या व्यक्तींनी मारहाण केली या घटनेचा नेवासा तालुका एकता पत्रकार संघ तीव्र निषेध केला संबंधित हल्लेखोराना त्वरित अटक करून त्याच्यावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याने गुन्हा दाखल व्हावा तसेच महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले होत आहे त्या गुन्ह्यामध्ये मोठी वाढ झाली आहे ही चिंतेची बाब आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी असे निवेदनात नमूद केले आहे. 

 

निवेदनावर एकताचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित, जेष्ठ पत्रकार गुरू प्रसाद देशपांडे ,राजेंद्र वाघमारे, प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन गायकवाड , अनिल गर्जे, कारभारी गरड, इकबाल शेख, सुहास पठाडे, शंकर नाबदे, मकरंद देशपांडे, रमेश शिंदे, सतिष उदावंत पवन गरुड, अशोक पेहकरक, बाळासाहेब पंडित, संतोष औताडे, विजय खंडागळे आदींच्या सह्या आहेत. 

 

नेवासा तालुक्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहे तालुक्यातील पत्रकाराचे शिष्टमंडळ घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटून पत्रकारांवर हल्ला झाल्यास पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानवे गुन्हा दाखल करावा तशी सूचना सर्व पोलीस ठाण्यातील प्रमुखांना कळवावे अशी मागणी करणार आहोत असे नेवासात प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे