..श्रीरामपूर येथे एस टी संपकरी कामगारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, श्रीरामपूर शाखा कडून आवश्यक किराणा किट वाटप :-
एस टी कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून संपावर असल्याने एस टी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून कामगारांना पगार नाही त्यामुळे एस टी कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे एस टी च्या कामगारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात व भिमा भाऊ बागुल यांना भेटून आपल्या अडचणी सांगितल्या यानंतर लगेचच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज एस टी कामगारांना सुरेंद्र भाऊ थोरात व भिमा भाऊ बागुल यांच्या हस्ते दोनशे आवश्यक किराणा देण्यात आला , आर.पी.आय हा पक्ष एस टी कामगारांच्या कायम सोबत राहील व केंद्रिय मंत्री ना.रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वात कामगारांना न्याय देण्यासाठी री पा ई पक्ष एस टी कामगारांच्या बरोबर आहे, असे थोरात व बागुल यांनी कामगारांशी बोलतांना सांगितले, रिपब्लिकन पक्षाच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक एस टी डेपोत कामगारांना आवश्यक किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी संपकाळात आत्महत्या केल्या अश्या कामगारांच्या कुटुंबास पन्नास लाख रुपये राज्य सरकारनी मदत करावी अशी मागणी सुरेंद्र थोरात व भिमा बागुल यांनी केली, रिपाईचे तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ शिरसाट,विजय भाऊ,पवारभाऊ तेश भाऊ एडके यांनी कामगारांना पाठींबा देउन राज्य सरकार चा निषेध व्यक्त केला, सदर किराणा वाटपाचा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी रिपब्लकन पक्षाचे राजुभाऊ मगर,विशाल सुरडकर,मोहन आहवाड,सलीम शेख,पंकज भालेराव,संजय रोकडे,राजुनाना गायकवाड तसेच वेभव पंडित,मशिंद्रा ढोकणे,अनिल बागुल यांनी केले, या कार्यक्रमा साठी श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला एस टी चे कामगार व महिला कामगारांची संख्या जास्त होती. आयोजकांना उपस्थित एस टी कामगारांनी धन्यवाद दिले.