साप्ताहिक उद्धारक व भोसले प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आठ जून रोजी नाशिकरोड येथे 149 व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन

साप्ताहिक उद्धारक व भोसले प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आठ जून रोजी नाशिकरोड येथे 149 व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन

नाशिक ( प्रतिनिधी ) :-साप्ताहिक उद्धारक व भोसले प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आठ जून रोजी नाशिकरोड येथे 149 व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कौटुंबिक उपक्रमाचे उदघाटन ख्रिश्चन महिला जिल्हा प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या अँजेला शेरॉन यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रतापसिंग चव्हाण, मिखाएल दास, सुहासिनी घोडके, कांचनमाला भालेराव यांनी प्रश्नमंजुषा सत्रामध्ये उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

              या कौटुंबिक उपक्रमाचा नाशिकसह मुंबई, मनमाड, गुजरात, पुणे, नगर इत्यादी ठिकाणांहून आलेल्या 225 हुन अधिक पालकांनी फायदा घेतला.

              संस्थापक आनंद त्रिभुवन यांनी सुरुवातीस प्रास्तविक केले तर संयोजक श्रीधर भोसले यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.