राहुरी तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट,सर्वसामान्य जनतेची प्रचंड लुट .

राहुरी तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट,सर्वसामान्य जनतेची प्रचंड लुट .

राहुरी तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट,सर्वसामान्य जनतेची प्रचंड लूट.

         राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी भोंदू बाबांनी उच्छाद मांडलेला असून ठीक ठिकाणी विविध आजारांनी पीडित लोक त्यांच्याकडे जातात व त्यांच्याकडून त्यांची लूट केली जाते ही गोष्ट विभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्षात घेऊन भोंदू बाबांचा शोध घेऊन त्वरित भोंदू बाबांवर कारवाई करावीअशी मागणी नागरिकांमधून होत आहे .आजच्या विज्ञान युगात भोंदू बाबांच्या चमत्कारांना अनेक लोक बळी पडत आहेत त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे .

         राहुरी तालुक्यातील अनेक ठिकाणी गावागावात या भोंदू बाबांनी आपले ठाण मांडलेले आहेत.अंगात देव उतवणार तुमची देवाची हवा मोकळी करून देतो ,असे म्हणत अनेक लोकांना मनोरुग्ण करून टाकले आहे.

        असे प्रकार माहित असूनही पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत असतानाचे चित्र राहुरी तालुक्यात पहावयास मिळत आहे.

        अंधश्रद्धेचा हा कळस राहुरी तालुक्यात पाहावयास मिळत असून याकडे विभागीय पोलीस अधिकारी लक्ष देणार का ?

    या भोंदू बाबांचा पोलीस प्रशासन बंदोबस्त करणार का ?याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.