*माजी महापौर अभिषेक कळमकरचा अटकपूर्व जामीन अर्ज मा. न्यायालयाने फेटाळला.*
अहिल्यानगर : नगर येथील माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर, वय ३५ वर्षे, रा. भूतकरवाडी, बालिकाश्रम रोड, ता. जि. अहमदनगर याचा अटकपूर्व जामीन अर्ज मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जलदगती न्यायालय डॉ. यू. जे. मोरे साहेब कोर्ट क ६ यांनी फेटाळला. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकिल श्रीमती मनिषा. पी. केळगंद्रे-शिंद े यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २१/०२/२०२६ रोजी पिडित फिर्यादी हिन े एमआयडीसी पोलिस स्टेशन येथ े फिर्याद दिली की, फिर्याद देण्याच्या ३ महिन े आधी आरोपीन े • पिडितेची गरीब परिस्थिती पाहून तिला जॉब मिळवून देतो असे सांगून, एका काळ्या फॉर्चुनगर गाडीमध्ये विळद येथ े घेउन जाउन, एका निर्जन स्थळी गाडीमध्ये पिडितेवर अत्याचार केले. त्यानंतर आरोपी वेळोवेळी पिडितेस व्हिडिओ कॉल करून अश्लिल हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होता. तसेच फिर्यादी पिडित हिस तसे वर्तन करण्यास भाग पाडले. त्यानंतर दि. १८/०२/२०२६ रोजी पुन्हा पिडित हिस शिरूर येथील एका हॉटेलमध्ये बोलवून बळजबरीने अत्याचार केला. आरोपीच्या या सर्व छळास व त्रासास कंटाळून फिर्यादी पिडितेने आरोपी अभिषेक कळमकर

याचेविरूध्द एमआयडीसी पोलिस स्टेशन येथ े गु.र. क १३२/२०२६ ने भा. न्या.स. कलम ६४ (१), ६४ (२), (m) ६९, ३५१ (२) नुसार तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ई नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीन े मा. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जामध्ये सरकार तर्फे लेखी म्हणण े दाखल करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलिस स्टेशनच े पी. आय. भांबळ हे स्वतः गुन्ह्यातील सर्व कागदपत्रे घेउन हजर होते. युक्तिवादाच्या वेळी सरकारी वकिल श्रीमती मनिषा. पी. केळगंद े शिंदे यांनी मा. न्यायालयास सांगितले की, पिडित महिला ही पिडित महिला ही एक गरीब महिला आहे. ती नोकरीसाठी प्रयत्न करीत होती. अर्जदार आरोपी हा राजकीय नेता आण ि अहिल्यानगर शहराचा माजी महापौर असल्याने त्याने तिला नोकरी देण्याच े आश्वासन दिले म्हणून, पिडितेने त्या उददेशान े आरोपी याच्याशी संपर्क साधला आण ि आरोपीन े पिडितेच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. आण ि नोकरीचे अमिश देउन पिडितेवर बळजबरीने शारिरीक अत्याचार केले. विळद घाट हे अतिशय निर्जन ठिकाण आहे. तसेच समाज माध्यमांवर आरोपीच े अर्धनग्न विडीओ व्हायरल झालेले आहे. याबाबत देखील विचार करणे आवश्यक आहे. तसेच आरोपी यान े गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची फॉर्चुनर गाडी तसेच आरोपी याचा मोबाईल जप्त करणे आवश्यक असल्याने आरोपीस अटक होणे अतिशय गरजेच े आहे. त्यामुळ े आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. सरकारी वकिलांच्या युक्तिवादावरून मा. न्यायालयान े या जामीन अर्जाचा निकाल देतेवेळी असे नमूद केले की, सध्याच्या प्रकरणात आरोपांच े गंभीर स्वरूप पाहता तसेच आरोपीच े वाहन व मोबाईल जप्त करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचे इलेक्टॉनिक पुरावे गोळा करणे आहे. तसेच प्रभावी तपासासाठी आरोपीला ताब्यात घेउन चौकशी करणे आवश्यक आहे. यदाकदाचित आरोपीला जामीनावर खुले केल्यास आरोपी पिडितेवर दबाव आणण्याची तसेच पुरावे नष्ट करण्याची तसेच पुढील तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा सर्व गोष्टींचा विचार करून मा. न्यायालयान े आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे. सदर अर्जाचे वेळी सरकारी पक्षास मूळ फिर्यादीतर्फे अॅड. विजय गुंदेचा यांनी हजर होउन सहकार्य
केले.








