बांधकाम कामगारांच्या होणाऱ्या पिळवणुकी संदर्भात नेवासा नगरपंचायतवर बांधकाम कामगार आघाडीच उद्या लाक्षणिक निषेध मोर्चा.

बांधकाम कामगारांच्या होणाऱ्या पिळवणुकी संदर्भात नेवासा नगरपंचायतवर बांधकाम कामगार आघाडीच उद्या लाक्षणिक निषेध मोर्चा.

प्रतिनिधी खेडले परमानंद नेवासा

नेवासा नगरपंचायतवर बांधकाम कामगार आघाडीच उद्या लाक्षणिक निषेध मोर्चा

  नेवासा तालुक्यातील बांधकाम कामगारांना कामगार महामंडळ अनेक प्रकारचे लाभ देण्यास कटिबद्ध आहे.

हा लाभ घेण्यासाठी व बांधकाम कामगार नोंद करण्यासाठी 90 दिवसांचा दाखला हा अपेक्षित आहे.

        हा दाखला स्थानिक नगरपंचायत व ग्रामपंचायत यामध्ये अधिकाऱ्यांकडून मिळत असतो.अधिकारी या कामगारांना ब्रिटिश राजवटी पेक्षाही खालच्या दर्जाची वागणूक देऊन सर्व सामान्य मजुरांना न कळणारी कायद्याची भाषा दाखवून धुडकवून देत आहेत, पण गेली काही दिवस नेवासा नगरपंचायत व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत येथे बांधकाम कामगारांना हा दाखला कुणाकडून घ्यावा यावरच शंका आहे कारण इथले अधिकारी दाखला देण्याकरता टाळाटाळ करत आहेत शेजारच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयातून दाखला मिळालेला दाखवला असतानाही स्थानिक ग्रामसेवक मात्र हे आमच्याकडे होत नाही असे उत्तर देतात हे काम माझ्याकडे नाही असा प्रत्येक अधिकारी कामगारांना सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे.

      असा आरोप कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे यांनी केला आहे. विवेक नन्नवरे यांनी वारंवार निवेदन देऊन व वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा करून व मुख्य अधिकारी साहेब गरकळ यांची भेट घेऊन बऱ्याच वेळा बांधकाम कामगार मजुरांच्या प्रश्नावर 90 दिवसाच्या दाखला देण्यात साठी कामगार आयुक्त व सी ओ गरकळ यांचा मेळ घालून देखील अधिकारी काम करत नसल्यामुळे याचा निषेधार्थ संबंधित घटनेला न्याय मिळण्यासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठीआम्ही बांधकाम कामगार उद्या दिनांक 5/9/23 रोजी एक दिवसीय 

 आंदोलन करून अधिकारी व प्रशासनाचा जाहीर निषेध करणार आहोत याची दखल अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने घ्यावी. व आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन व अधिकारी जबरदस्त असतील.

    असा विचार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दिला आहे. याप्रसंगी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रतिक शेजुळ उपाध्यक्ष अनिल परदेशी,व श्रीकांत बर्वे उपस्थित होते.