राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावामध्ये एकाच रात्री 3 ठिकाणी जबरी चोरी
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे शुक्रवार, दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री गावाच्या मध्यभागी तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्याची घटना घडली असून
राहुरी ता प्रती डाँ देवेंद्र शिंदे
, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वांबोरी गावातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे 50 ते 60 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. तसेच, निराश शर्मा यांच्या शर्मा ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून सुमारे एक किलो पर्यंत चांदी चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आणि याच रात्री अनोज पंजारीया हे बाहेर गावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात उचकापाचक केल्याचेही आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्यासह समाधान फडोळ, अशोक झिने, सुनील निकम, सुरज गायकवाड, प्रमोद ठाकणे, इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने वांबोरी गावात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.









