संस्कृत भाषेपासून हिंदी भाषेचा उगम झाला.:- सुनील जायभाय

संस्कृत भाषेपासून हिंदी भाषेचा उगम झाला.:-  सुनील जायभाय

संस्कृत भाषेपासून हिंदी भाषेचा उगम झाला - सुनील जायभाये 

 

भारत भालेराव

तालुका प्रतिनिधी, 

 

शेवगाव: श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला म्हणून या दिवशी देशात हिंदी दिवस साजरा केला जातो भारत हा देश विविधतेतून एकात्मता जपणारा देश आहे आणि जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारतीयांना जोडणारी भाषा म्हणून हिंदी ला प्राधान्य मिळाले आहे आणि भारतीय एकतेचे प्रतीक हिंदी भाषा बनली आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना विद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.विनोद फलके यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगून हिंदी विषयात पारंगत झाल्यास उपलब्ध रोजगाराच्या विविध संधी विद्यार्थ्यांना सांगितल्या.विद्यालयातील विद्यार्थिनी कु.वाकडे हर्षदा,उकिर्डे समीक्षा,ओम काशीद,सार्थक निजवे,समृद्धी आव्हाड यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषा दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या संपूर्ण देशात 250 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात परंतु हिंदी भाषेला देशभर महत्व प्राप्त झाले ते हिंदी भाषा राष्ट्रभाषा झाली तेव्हापासून.संस्कृत भाषेपासून हिंदी भाषेचा उगम झाला आणि सर्वाधिक हिंदी भाषा बोलली जात असल्याने भारताला हिंदुस्थान असे संबोधले जात असे.हिंदी भाषा ही संपर्क भाषा म्हणून स्वातंत्र्य लढ्यात वापरली गेली आणि आज हिंदी भाषेचे समृद्ध आणि अर्थपूर्ण साहित्य अध्ययनासाठी उपलब्ध आहे त्याचे अध्ययन आपण केले पाहिजे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यालयातील इ ९ वी च्या विद्यार्थिनी कु.दीपाली उकिर्डे व कु.श्रुतिका देशमुख यांनी केले कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांचेसह संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे, जेष्ठ शिक्षक भाऊसाहेब टाकळकर यांचे सह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.