मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शिबिर संपन्न...!!!

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु  शिबिर संपन्न...!!!

    श्रीरामपूर:-     (प्रतिनिधी)   हरेगाव शिव मारुती मंदिर या ठिकाणी अग्निपंख फाउंडेशन आणि तुलसीआय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

शिबिराचे उद्घाटन मंदिर अध्यक्ष अनिल भानगडे व सुनील भाऊ वाकचौरे यांच्या हस्ते झाले आणि त्यांचे अनमोल सहकार्य लाभले ह्या शिबिरास अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक निरज भैय्या मुरकुटे तसेच विरेश पाटील गलांडे यांनी भेट दिली. यावेळी अग्निपंख फाऊंडेशनचे संस्थापक स्वप्नील पंडित सर यांनी फाऊंडेशन मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. निरज भैय्या यांनी उपस्थित असलेल्या पेशंटची विचारपूस केली तसेच अग्निपंख फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा देखील केली. या शिबिरामध्ये माळेवाडी, उंदीरगाव हरेगाव, ब्राह्मणगाव व पंचक्रोशीतील 203 नागरिकांनी सहभाग घेतला.या शिबिरास 33मोफत मोतीबिंदूबिंदू ऑपरेशन होणार आहेत

अशा उपक्रमांमुळे समाजाला आरोग्यविषयक जाणीव होते आणि गरजूंना मदत मिळते असे मत निरज भैय्या मुरकुटे यांनी व्यक्त करून अग्निपंख फाऊंडेशनच्या कार्याला आणि भविष्यातील अशा समाज उपयोगी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या !

या शिबिरास गावातील आणि पंचक्रोशीतील ज्येष्ठ आज्जी आजोबा, माता- भगिनी, सर्व पदाधिकारी, युवक मित्र उपस्थित होते.