देडगाव ग्रामपंचायत निवडणूकित चौरंगी लढत सरपंच पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 50 उमेदवार रिंगणात
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यात विविध ग्रामपंचायत निवडणुका लागल्या असून त्यामध्ये बालाजी देडगाव ची ग्रामपंचायत 2023 ही निवडणूक लागली असून अंतिम यादी जाहीर झाली असून या लढतीत 4 पॅनल तर सरपंच पदासाठी 7 उमेदवार व सदस्य पदासाठी 50 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
जनतेतून सरपंच असल्याने यामध्ये निलेश म्हातारदेव कोकरे ,रामेश्वर कारभारी गोयकर, चेडे आकाश अशोक, मुंगसे चंद्रकांत भानुदास , मुंगसे विलास मच्छिंद्र ,शिरसाट सचिन गंगाधर, हिवाळे फकीरचंद तुकाराम उमेदवार सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत.
नेवासा तालुक्यात अतिशय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे समजले जाणारे बालाजी देडगाव अतिशय चुरशीची व अटी तटीजी ची लढत पार पडणार असून अनेक रथी महारथी आपले अस्तित्व पणाला लावणार आहेत .ही निवडणूक रंगतदार होणार असून जनता कोणाला कौल देईल याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीमध्ये आमदार शंकरराव गडाख पाटील व जय हरी बाळासाहेब मुरकुटे पाटील व वंचित बहुजन असे पॅनलचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ही अंतिम यादी निवडणूक प्रक्रिया नेवासा येथे निवडणूक निवडणुक अधिकारी सुरेश भांगे रावसाहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्तव्यदक्ष तलाठी बालाजी मलदोडे यांच्या अधिकाराखाली पार पडली असून चिन्ह वाटप करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी सुरेश भांगे यांनी निवडणूक शांततेत करावी असे आवाहन केले.