महापावन गणपती येथे बालाजी फाउंडेशन व देवस्थानच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाश्रमदान सप्ताहास सुरुवात .
बालाजी देडगाव:- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील देडगाव, पाचुंदा , माका ,महालक्ष्मी हिवरा परिसरातील महापावन गणपती येथे बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर शिवाजीराव पठाडे व गणपती देवस्थानच्या वतीने दिनांक ७ ते १४ पर्यंत आयुष्यमान भारत कॅम्प ,महाश्रमदान व वृक्षारोपण उपक्रम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दिनांक ७ रोजी पावन गणपती वनराईत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करत परिसरातील स्वच्छता करण्यास सुरुवात झाली.
७, ८, ९ या रोजी स्वच्छतेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे.
यानंतर बालाजी फाउंडेशन व पावन गणपती देवस्थान च्या वतीने प्रमुख पाहुणे नेवासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे साहेब ,
पोलीस तुकाराम खेडकर व पोलीस खंडागळे दादा तसेच ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे, कडूभाऊ तांबे , बाबासाहेब मुंगसे , बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे दत्ता पाटील मुंगसे, गणेश औटी, नगरच्या पत्रकार प्रियंका पाटील शेळके , पत्रकार युनूस पठाण तसेच नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत मुंगसे व सर्व नूतन सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे साहेब व सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या. व परिसरातील पाहणी केली.
दिनांक १० रोजी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे साहेब व चला हवा येऊ द्या चे पत्रलेखक अरविंद जगताप तसेच सैराट चित्रपटाचे लेखक धनंजय शेडबाळे यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ११ रोजी आदर्श हिवरे बाजारचे आदर्श गाव योजना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते वनराई ची पाहणी करून विविध प्रकारची वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीमध्ये आयुष्यमान भारत कॅम्प चे आयोजन करण्यात आले असून या योजनेसाठी सर्व लाभार्थ्यांनी येऊन आपली कार्ड घ्यावीत या श्रमदान मध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवराला आयुष्यमान भारत कार्ड दिले जाईल. त्याकरिता लाभार्थ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन यावे.
दिनांक १२ रोजी पद्मश्री आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड व मार्गदर्शन करण्यात येणार असून परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नामांकित व्यक्तींचा आदर्श घेण्यासाठी व कामाची पद्धत जाणून घेण्याकरिता मार्गदर्शनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर शिवाजीराव पठाडे उपाध्यक्ष गणेशराव घुले ,सचिव शिवाजीराव उबाळे ,ज्येष्ठ सदस्य गणेश औटी व महापावन गणपती देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे , विश्वस्त अशोकराव मुंगसे ,बन्सी महाराज मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, लक्ष्मणराव मुंगसे, नवनाथ रक्ताटे आदिनाथ कुटे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी बंडूभाऊ क्षीरसागर यांनी वृक्षांच्या पाण्याच्या नियोजन करता शंभर माठ देऊन श्रमदानात सहभाग घेतला.