मुळा धणाच्या भिंतीवर मा.जि.प.सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पा. यांचे उपोषण.

मुळा धणाच्या भिंतीवर मा.जि.प.सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पा. यांचे उपोषण.

अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सागर ( मुळा धरण ) पाण्यात पंचक्रोशीतील गोर गरीब आदीवासी बांधव मच्छीमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते

परंत धरण प्रशासनाचे कर्मचारी. अधिकारी. व पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्यांना या मच्छीमार व्यावसायापासून दूर ठेवण्यात आले.

व त्या आदीवासी बांधवांवर आज रोजी उपासमारीची वेळ आली आहे या आदीवासी बांधवांना त्यांचा पारंपारीक व्यावसाय मिळवून देण्यासाठी मा.जि.प. सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पा.हे मा.जि.प.सदस्य भारत जाधव.विजय बर्डे. संतोष शिंदे.गणेश माळी.अमोल पवार. जालिंदर माळी. कैलास बर्डे.नाना पवार. नवनाथ.शिंदे.विनित मोरे.बाळासाहेब बर्डे. तुळशीराम बर्डे.दिपक बर्डे. यांचेसह आंकुश बर्डे. मुळा धरणाच्या मुख्य प्रवेश द्वारावर उपोषणास बसले आहे.

ह्या मच्छीमार व्यावसाय करणाऱ्या आदी वासी बांधवांना न्याय देण्यासाठी आपन हे उपोषण आरंभीले असून या आदीवासींना न्याय मिळूपर्यंत हे उपोषण सोडनार नाही असे धनराज गाडे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.