शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची सौ . हर्षदाताई काकडे यांनी केली पाहणी .
शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सौ.हर्षदाताई काकडे.
आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.गारपिटीने कांदा पिकाला पातच राहिली नसून काढलेल्या गहू, कांदा पिकात मोठया प्रमाणात पाणी साचले गेले.भायगाव, देवटाकळी, शहरटाकळी, भातकुडगाव, ढोरजळगाव आव्हाणे येथील शेतकरी बांधवांच्या शेतामधील झालेल्या पिकाचे नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.शेवगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच शेतकरी संकटात असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
शेती पिकाचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झाले, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला त्यामळे एकीकडे शेतमालाला भाव नसल्याने तर दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधव उध्वस्त झाला आहे अशी भावना सौ. हर्षदाताई काकडे यांनी बोलताना व्यक्त केली.तसेच शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेताचे व त्यामधील कांदा, गहू, बाजरी,फळझाडें इत्यादी पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी मी प्रशासनास भाग पाडून सर्वतोपरी मदत करणार, शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर सोडू नये असे आवाहन सौ.काकडे यांनी केले
.