अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली .
अतिवृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली .
खेडले परमानंद नेवासा प्रतिनिधी // संभाजी शिंदे । .
शेतकऱ्याच संपूर्ण जीवन शेतीवर आधारित असल्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक बजेट कोलमडले आहे.
शेतीशी निगडित असलेला महत्त्वपूर्ण खेड्यातला कना म्हणजे शेत मजुर शेतीचे काम पूर्णतः ठप्प झाल्यामुळे शेतमजूर संकटात सापडला आहे .
शेतमजूर व शेतकरी दोघ हि जोडधंदा म्हणून जो पशुपालनाचा व्यवसाय करायचे तो जनावरा मध्ये आढळणाऱ्या लंपी आजाराने पूर्णतः कोसळला आहे.
ग्रामीण भागाची एकंदरीत परिस्थिती पाहता इन्कम सोर्स ज्या ठिकाणावरून होता ते सर्व माध्यम आज ठप्प झाल्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे .
मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मजुरावर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यामुळे शेतीवर आधारित इतर व्यवसाय देखील ठप्प झालेले आहेत .
कापूस ,सोयाबीन, मका जमीनदोस्त झालेल्या पाहून शेतकरी सुद्धा हातबल झालेला आहे .शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी जे पूर्वीच चर- चाऱ्या होते ते बुजवली गेल्यामुळे पाणी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचलेल्या परिस्थितीत आहे .
पंचनामे करून बुडत्याला आधार म्हणून सरकारने जे कागदी घोडे नाचायला लावलेले आहे त्यासाठी माकडाप्रमाणे उड्या मारण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे .शासन दरबारी शेत्रफळ नोंद ई पीक पाहणी सर्व असतानाही शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कागदपत्र जमा करावे लागत आहे.
त्यात अतिरेकी पावसामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे व त्याचा परिणाम आरोग्यावर झाल्यामुळे जवळ असलेल्या पैसा दवाखान्यात घालण्याची वेळ आलेली आहे .
एकंदरीत वरील सर्व परिस्थिती पाहला शेतकऱ्याची व शेतमजुराची चालू वर्षाची दिवाळी गोड -धोड होईल असे वाटत नाही.








