शिर्डीत राज्यस्तरीय युवा संत संमेलन..

शिर्डीत राज्यस्तरीय युवा संत संमेलन..

शिर्डीत राज्यस्तरीय युवा संत संमेलन...

प्रतिनिधी : प्रसाद घोगरे,, ९३७०३२८९४४.

शिर्डी_विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र व गोवा राज्य धार्मिक विभागाच्या वतीने शिर्डीत ५, ६ व ७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय युवा संत चिंतन वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या वर्गात हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांतील युवा संत, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार व कथाकार सहभागी होणार आहेत.

या चिंतन वर्गामध्ये संतांची साधना, समाज प्रबोधन, संतांचे आरोग्य, राष्ट्र जागरणातील संतांची भूमिका, हिंदू धर्मासमोरील आव्हाने व त्यावरील उपाय यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच डिजिटल कौशल्य विकास, चर्चासत्रे आणि संयुक्त चिंतनाचाही या उपक्रमात समावेश असेल.

या वर्गासाठी नोंदणी इच्छुक युवा संतांनी नगर जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख प्रशांत बहिरट (९५११५९२५५५) किंवा मिलिंद चवंडके (९४२२४९५२८९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमासाठी जिल्हामंत्री विशाल वाकचौरे, अनिल जोशी, सचिन तांबे, जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले, गोपाल राठी, धर्मप्रसार प्रांत सदस्य प्रशांत बेल्हेकर, कोषाध्यक्ष वाल्मिक धात्रक, दिपक शिनगर, योगेश मखाना, बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक व ईश्वर टिळेकर यांनी परिश्रम घेतले आहेत.