अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब यांची श्रीरामपूर येथे धडाकेबाज कारवाई... श्रीरामपूर मध्ये दहा गावठी हातभट्टी दारू आड्ड्यावर छापा... 3 लाख 97 हजार किमतीची हातभट्टी दारू नष्ट....!!
श्रीरामपूर :-- श्रीरामपूर येथे वेगवेगळ्या पद्धतीचे अवैधधंदे जोमात सुरु असल्यामुळे श्रीरामपूर या ठिकाणी अहिल्यानगर चे पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घार्गे साहेब यांनी नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस यांना श्रीरामपूर येथील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.मिळालेल्या सूचनेप्रमाणे नेमलेल्या या पोलीस पथकातील पोलिस ठाणेअमलदार मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे, संदीप दरंदले,रमीराजा अत्तार,बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे यांनी श्रीरामपूर तालुक्यात असणाऱ्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या आडड्यांची माहिती काढून दिनांक 26/6/2025 रोजी या पथकाने वेगवेगळ्या अशा दहा ठिकाणी छापे मारून सुमारे 3 लाख 97 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे.
या कारवाईमध्ये दहा ठिकाणी गुन्हे दाखल करून सुमारे 3,97,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये
1) 40 लिटर हातभट्टी दारू व 350 लिटर कच्चे रसायन सुमारे 43 हजार रुपये
2) 30 लिटर हात भट्टी दारू व 300 लिटर कच्चे रसायन 36 हजार रुपये
3) 40 लिटर हातभट्टी दारू तीनशे लिटर कच्चे रसायन सुमारे 38 हजार रुपये
4) 50 लिटर हातभट्टी दारू व 400 लिटर कच्चे रसायन सुमारे 38 हजार रुपये
5) 30 लिटर हातभट्टी दारू 350 लिटर कच्चे रसायन सुमारे 41 हजार रुपये
6) 30 लिटर हातभट्टी दारू व 350 लिटर कच्चे रसायन सुमारे 41 हजार रुपये
7) 35 लिटर हातभट्टी दारू व 300 लिटर कच्चे रसायन सुमारे 37 हजार रुपये
8)30 लिटर हातभट्टी दारू 350 लिटर कच्चे रसायन सुमारे 41 हजार रुपये
9) 45 लिटर हातभट्टी दारू व 200 लिटर कच्चे रसायन सुमारे 29 हजार रुपये
10) 45 लिटर हातभट्टी दारू 400 लिटर कच्चे रसायन सुमारे 49 हजार रुपये
असा एकूण 3,97,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यापुढेही श्रीरामपूर मध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. कारवाई करण्याकरता जिल्ह्यामध्ये 5 पथके नेमली असून दिलेल्या सुचने प्रमाने ते कारवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सदर श्रीरामपूर तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री.सोमनाथ घार्गे,श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराव शिवपुजे.यांच्या व सूचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ठाणे अंमलदार मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे,संदीप दरंदले,रमीज राजा अत्तार,बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे यांनी केली आहे.








