*राहुरी कृषी विद्यापीठ येथील कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय कदम यांची तर उप चेअरमन पदी सौ.भारती बरे यांची निवड.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 27 मार्च, 2026*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक श्री. मंगेश सुरवसे यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमनपदी श्री. दत्तात्रय कदम तर व्हाईस चेअरमनपदी सौ. भारती बरे यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विक्रम कड, डॉ. नारायण मुसमाडे, श्री.योगेश भिंगारदे, श्री.आप्पासाहेब चोपडे, संचालिका सौ.माधुरी औताडे तसेच पतसंस्थेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्या. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ही जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावाजलेली पतसंस्था असून या पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांची आर्थिक उन्नती साधण्यामध्ये मोठा वाटा आहे. या पतसंस्थेच्या वाटचालीमध्ये सर्व आजी व माजी संचालकांचा आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे. नुकतीच झालेली पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. पदाधिकार्यांच्या या निवडीबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री दत्ता कदम यांची निवड झाल्यामुळे राहुरी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला आहे . तसेच तालुक्यातील अनेक पत्रकार बांधवांनी त्यांचा सन्मान केला असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .








