कानिफनाथ चौक येथील नामांकित असलेले प्रभू श्रीराम मंदिर येथे राम नवमी निमित्त उत्सव साजरा करण्यात आला

कानिफनाथ चौक येथील  नामांकित असलेले प्रभू श्रीराम मंदिर येथे राम नवमी निमित्त उत्सव साजरा करण्यात आला

कानिफनाथ चौक येथील प्रसिद्ध असलेले प्रभू श्रीराम मंदिर येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

यावेळी मंदिराचे पुजारी मंदार जोशी (सर ) व यांच्या परिवाराने  मंदिर सजावट करण्यासाठी

विशेष प्रयत्न केले

26-3-2026 रोजी साला बदाप्रमाणे प्रभू श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला व विविध प्रसादांचे वाटप करण्यात आले तसेच

राहुरी येथील पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब यांनाही राम नवमी निमित्त श्रीरामांचे दर्शन घेतले व सर्वांना राम नवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या  

या कार्यक्रमासाठी राहुरी शहरातील सर्व युवा कार्यकर्ते व महिला भगिनी यांनी रामनवमी निमित्त गाण्याचा व भजनाचा कार्यक्रम केला व मंदिरला आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आली  प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा पाळणा अतिशय सुंदर प्रकारे सजवण्यात आला होता

 सर्व राम भक्तनी दर्शन ,महाप्रसादाचा लाभ घेतला रामनवमी आनंदाने उत्साहाने साजरी करण्यात आली