राहुरी तालुक्यातील अवैध व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना राहुरी पोलीस स्टेशनचे अभय,उच्चस्तरीय गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यासाठी सामाजिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.
राहुरी तालुक्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांना राहुरी तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत चालू असलेल्या अवैध व बेकायदेशीर दोन नंबरच्या धंद्याबाबत तसेच यास जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे .
या निवेदनात म्हटले आहे की आम्ही राहुरी शहरातील व राहुरी तालुक्यातील वेगळ्या सामाजिक संघटनेचे व राजकीय पक्षांचे पदाधिकारी असून आमच्या राहुरी तालुक्यात व शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे खुलेआमपणे चालू असून याकडे राहुरी पोलीस स्टेशन कानाडोळा करीत आहे तसेच यांना अभय देण्याचे काम पोलीस करत आहे .तालुक्यातील ग्रामीण भागात गावठी दारू,,जुगार, मटका असे बेकायदेशीर धंदे सर्रास चालू असून यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.अशा धंद्यांना राहुरी पोलीस स्टेशनचे पाठबळ आहे का ? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे .
शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी,केबल, स्टार्टर चोरी जात असून वेगवेगळ्या प्रकारच्या टू व्हीलर मोटरसायकल चोरीचेही प्रमाण वाढले आहे. मुलींची छेडछाड व रोड रोमिओमुळे मुलींना पळून घेऊन जाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.हॉटेल वरील वेश्याव्यवसाय तसेच बेकायदेशीर वाळू तस्करी जोमात सुरू आहे.रस्त्यावरीलअपघाताची तक्रार घेण्यास पोलीस स्टेशनमध्ये टाळाटाळ केली जाते.तालुक्यात गावठी कट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे.बेकायदेशीर सावकारकीचे धंदेही चालू आहेत याला सर्वस्वी राहुरी पोलीस स्टेशन जबाबदार असल्याचा उल्लेख या निवेदनामध्ये करण्यात आला आहे.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर सुरू असलेले धंदे हे वेळीच थांबले नाही तर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते राहुरी पोलीस स्टेशन विरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशाराही या निवेदनात करण्यात आला आहे .त्यामुळे सदर तक्रारीची सरकारने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन उच्चस्तरीय गुप्तचर विभागामार्फत चौकशी करून राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे .
हे निवेदन देण्यासाठी ॲड . भाऊसाहेब पवार,ओंकार देशपांडे, गणेश उंडे, प्रतीक विधाते, संदेश गायकवाड, राजेंद्र आढागळे, मनोज जाधव, भाऊसाहेब उंडे,संतोष चोळके, सह अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.