सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी नागाला केले जेरबंद .

सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी नागाला केले जेरबंद .

सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी नागाला केले रेस्क्यू

26-3-2026

राहुरी ता प्रतिनिधी -  डॉ देवेंद्र शिंदे

समजलेल्या माहितीनुसार तनपुरेवाडी येथील येथील प्रगतशील शेतकरी व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अरुण साहेब तनपुरे यांच्या शेतामध्ये विहीर आहे त्या वीरजवळ त्यांच्या शेतातील मजूर सकाळी कामाला गेले असता त्या ठिकाणी त्यांच्या शेतातील कामगारांना एक भला मोठा नाग दिसून आला  

हा नेत्यांनी पप्पू डहाळे यांना माहिती दिली आणि त्यांनी कृष्णा पोपळघट ( सर्पमित्र ) यांना फोनवर माहिती देऊन घटनास्थळी बोलवून घेतले आणि कृष्णा पोपळघाट यांनी नागा अतिशय विषारी सर्प असून याला रेस्क्यू करणे खूप कठीण असते पण कृष्णा पोपळघाट यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी सात फूट असलेल्या विषारी नागाला रेस्क्यू करून बाटलीमध्ये जेरबंद केले आणि तेथील शेतमजूर व सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी कृष्णा पोपळघट यांचे आभार मानले व कृष्णा पोपळघट यांनी राहुरीतील सर्व जनतेला सांगितले की कुठेही साप दिसला तर आम्हाला कॉल करा आम्ही सदैव तुमच्या मदती साठी तयार आहोत  

यावेळी कृष्णा पोपळघाट यांनी त्या ठिकाणी  माणसांचा व प्राण्यांचा या दोघांचाही जीव सुरक्षितपणे ठेवत आपली कामगिरी बजावली

कृष्णा पोपळघट यांनी या नागाला जोगेश्वरी आखाडा बागडा डोंगर येथे रिलीज केले निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले