सर्पमित्र राहुल गायकवाड यांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी लांडोरी मोर या जातीच्या पक्षाला केले रेस्क्यू
सर्पमित्र राहुल गायकवाड यांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी लांडोरी (मोर) या जातीच्या पक्षाला केले रेस्क्यू
मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील सर्वांना माहीत असलेले सर्पमित्र राहुल गायकवाड हे नेहमीप्रमाणे विद्यापीठात सिक्युरिटी गार्डचे काम करतात कामावर येत असताना त्यांन प्रथमता विद्यापीठ बियाणे विभाग येथील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ नवनाथ दराडे यांचा फोन आला असता वन्यजीव संरक्षण सर्पमित्र राहुल गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन राष्ट्रीय पक्षी लांडोरी ( मोर ) या पक्षाला अतिशय सीताफिने रेस्क्यू करून ताब्यात घेतले
आणि या दोघांनी वनरक्षक श्री बाळासाहेब आटोळे यांना झालेली घटनेची माहिती दिली आणि
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मेंढी संशोधन प्रकल्पाचे डॉ रवींद्रनाथ निमसे यांनी या पक्षाला प्रथमोपचार करून विद्यापीठाच्या मेंढी संशोधन प्रकल्पा

वरती उपचार करून येथे जागा आहे या पक्षाची व्यवस्थित काळजी घेतली जाईल याची ग्वाही देऊन बाळासाहेब आटोळे यांनी त्यांना या कामासाठी मदत केली व परवानगी दिली आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा सर्वांना प्रख्यात असलेले सर्पमित्र राहुल गायकवाड व डॉ रवींद्रनाथ निमसे आणि फॉरेस्टचे अधिकारी यांचा समक्ष लांडोरी (मोर) या जातीच्या पक्षाला वन विभागामध्ये सुपूर्द करण्यात येईल व निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात येईल
महात्मा फुले कृषी विद्यापीठातून व मुळा डॅम परिसरातून सर्पमित्र राहुल गायकवाड व डॉ रवींद्रनाथ निमसे व डॉ दराडे व फॉरेस्टचे अधिकारी बाळासाहेब आटोळे यांचे परिसरातून विशेष जनतेतून कौतुक केले जात आहे
राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे








