आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीत लाखोंची केबल चोरी ; परिसरात भीतीचे वातावरण

आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीत लाखोंची केबल चोरी ; परिसरात भीतीचे वातावरण

आळेफाटा पोलिस स्टेशन हद्दीत लाखोंची केबल चोरी; परिसरात भीतीचे वातावरण

 

         आळेफाटा पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात केबल चोरीची घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या कामासाठी आळे गावातील दक्षिण लवनवाडी शिवारात केबल टाकण्याचे काम सुरू होते.

 

           दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७ लाख रुपये किमतीची केबल चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात केबल चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

         या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना चोरट्यांना कोणाचे पाठबळ होते का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

 

        या घटनेचा तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत असली, तरी गुन्हा दाखल बाबत आवश्यक माहिती प्राप्त नसून, चोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

 

         दरम्यान, पुणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मानला जात असताना अशा घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात लवकरात लवकर स्पष्ट माहिती व ठोस कारवाई होण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.