प्रहार जनशक्ती पक्ष राहुरी युवा तालुकाध्यक्षपदी ऋषिकेश ईरुळे यांची नियुक्ती- सुरेशराव लांबे पा ..
प्रहार जनशक्ती पक्ष नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मा श्री विनोदसिंग परदेशी साहेब व राहुरी प्रहारचे तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील यांच्या हस्ते राहुरी तालुका युवा तालुकाध्यक्ष पदी श्री ऋषिकेश खंडू इरुळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रहार सैनिक दळवी साहेब,ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव झावरे साहेब,सुकालाल बेलकर,संतोष वैद्य,शिकारे साहेब,हजर होते,
महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.मंत्री आ.बच्चुभाऊ कडु साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी,कामगार,दिव्यांग,व बहुजन समाज्याच्या प्रलंबित प्रश्न व वंचित घटकांन साठी गेली 20-25 वर्षापासून प्रभावीपणे काम करून न्याय मिळवून देतात आमदार बच्चुभाऊंच्या विचाराला प्रेरित होऊन महाराष्ट्रातील अनेक तरुण कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करतात,
त्याप्रमाणे गेले अनेक वर्षापासून राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य शेतकरी,शेतमजुर कामगार,दिव्यांग वंचित पीडित घटकांसाठी सतत काम करणारे प्रहार चे तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांचे नेतृत्व मान्य करत ताहाराबाद बेलकर वाडी येथील शेतकरी कुटुंबातील युवा कार्यकर्ता श्री ऋषिकेश इरुळे यांनी तालुका अध्यक्ष लांबे यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली या युवा कार्यकर्त्याच्या शेतकरी दिव्यांग घटकांसाठी भावना लक्षात घेता सोमवार दिनांक 7,11,2022 रोजी जिल्हाध्यक्ष श्री.विनोदसिंग परदेशी साहेब व राहुरी तालुका अध्यक्ष श्री.सुरेशराव लांबे यांनी ऋषिकेश इरुळे यांची प्रहारच्या राहुरी युवा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली अशी माहीती तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिली
यावेळी बोलताना श्री.ऋषिकेश इरुळे यांनी आपण राहुरी तालुक्यातील खंबीर नेतृत्व असलेलेले तालुकाध्यक्ष श्री.सुरेशराव लांबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार दिव्यांग रुग्ण व्यक्तीसाठी काम करू व तरुणांचे संघटन करून तालुक्यातील प्रत्येक गावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नवीन शाखेचे नियोजन करू अशी ग्वाही दिली,
उपस्थित जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ताहाबादचे पत्रकार शिवाजीराव झावरे,सुकालाल बेलकर, संतोष वैद्य,दळवी साहेब,शिकारे सर व इतर कार्यकर्ते हजार होते ऋषिकेशच्या निवडीचे संपूर्ण राहुरी तालुक्यातून स्वागत होत आहे,