बँक इन्स्पेक्टर मुंगसे यांच्या सेवापूर्ती सोहळ्या निमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार.

बँक इन्स्पेक्टर मुंगसे यांच्या सेवापूर्ती सोहळ्या निमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार.

बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र भाऊसाहेब लक्ष्मण मुंगसे हे बँकेमध्ये बँक इन्स्पेक्टर पदावरून दीर्घ सेवेनंतर त्यांची सेवा निवृत्ती झाल्यामुळे ,ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान करण्यात आला.

         हा सेवानिवृत्ती सोहळा खरेदी विक्री संघाचे मा.संचालक कडूभाऊ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराजा संघटनेचे संस्थापक मच्छिंद्र मुंगसे यांनी केले.

               यावेळी ज्येष्ठ नागरिक कडूभाऊ दळवी, ज्ञानेश्वर कारखान्याचे मा. संचालक लक्ष्मणराव बनसोडे, प्रगतशील शेतकरी चंद्रभान कदम,सरपंच चंद्रकांत मुंगसे , पावन गणपतीचे विश्वस्त अशोकराव मुंगसे आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास , जीवनातील सुखदुःखाचे प्रसंग,त्यांच्या कामाचे कौतुक, करत

भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील जीवन आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे व सुखी समृद्धी भरभराटीचे जावो ही सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करण्यात आली.यानंतर ग्रामपंचायत ,विविध विकास सोसायटी, ज्ञानेश्वर सहकारी कारखाना, बालाजी देवस्थान, मुस्लिम समाज , काही वैयक्तिक व विविध संघटनेच्या ,शाखेच्या वतीने भव्य सन्मान करण्यात आला.

           यावेळी सेवापूर्ती झालेले भाऊसाहेब मुंगसे साहेब यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानत मी सर्वांचा ऋणी आहे. या ग्रामस्थांच्या सन्मानाने मी भारावून गेलो आहे .या पुढील काळामध्ये सामाजिक कार्य करीन अशी ग्वाही देत आपले मनोगत व्यक्त केले.

      यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे , शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे (अण्णा ),ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, पंचायत समितीचे मा. उपसभापती कारभारी चेडे, अहिल्याबाई होळकर शाळेचे माजी प्राचार्य भाऊराव मुंगसे सर, उपसरपंच लक्ष्‍मणराव गोयकर, मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे, युवा नेते संभाजीराजे काजळे ,मा. ग्रामसेवक भाऊसाहेब मुंगसे,बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे, शिवसेना तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे, बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोषराव तांबे,प्रगतशील कांदे शेतकरी बन्सी पाटील मुंगसे , अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड,सोन्या-चांदीचे व्यापारी मधुकर शिरसागर, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुनीलशेठ मुथा,युवा नेते निलेश कोकरे, सोसायटी चे चेअरमन महेश कदम, संचालक जनार्दन देशमुख,संजय पाटील मुंगसे, कचरू तांबे , सोसायटीचे सचिव रामा तांबे ,राजेंद्र अंबाडे,ग्रामपंचायत सदस्य अशोकराव तांबे, उद्धव मुंगसे, सचिन मुंगसे, बाबासाहेब तांबे, रमेश देवा तांदळे, मा.चेअरमन संदेश मुंगसे, पावन गणपतीचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे, कांदे व्यापारी देविदास रक्ताटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूसभाई पठाण यांनी केले तर आभार भीमसेन मुंगसे यांनी मानले.