महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अनुदानित राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकाऱ्यांचे एक दिवसीय पी एफ एम एस चे प्रशिक्षण संपन्न .

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अनुदानित राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकाऱ्यांचे एक दिवसीय पी एफ एम एस चे प्रशिक्षण संपन्न .

मफुकृवि राहुरी अंतर्गत अनुदानित राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील कार्यक्रम अधिका-यांचे एक दिवशीय पी .एफ . एम . एस चे प्रशिक्षण संपन्न .

 

           म .फु.कृ.वि. राहुरी अंतर्गत दहा जिल्ह्यातील अनुदानित राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील कार्यक्रम अधिका-यांचे व लिपिकवर्गीय कर्मचा-यांचे एक दिवशीय पी . एफ . एम . एसचे प्रशिक्षण संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या वतीने संपन्न झाले.या प्रशिक्षण आयोजनामागे मफुकृवि राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डाॅ पी.जी.पाटील व अधिष्ठाता डाॅ श्रीमंत रणपिसे यांचे मार्गदर्शन होते .  

 

           पी.एफ.एम.एस ऑनलाईन प्रणाली हाताळतांना केंद्र व राज्य शासनाकडून येणा-या अनुदानाचा वापर कसा करावा? याबाबतच्या माहीतीस्तव कार्यक्रम अधिका-यांना तज्ञ मार्गदर्शकांकडून राष्ट्रीय सेवा योजनेचे तथा विद्यार्थी कल्याणचे संचालक डाॅ.महावीरसिंग चौहान यांनी एक दिवशीय प्रशिक्षण आयोजलेले होते. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागतही डाॅ.महावीरसिंग चौहान यांनी केले. 

 

            सकाळच्या सत्रात तज्ञ मार्गदर्शक म्हणून राहुरीचे श्री सुनिल शिंदे सर व श्री धनवडे सर यांनी सर्व तांत्रिक माहीती प्रात्यक्षिताद्वारे समजावून सांगितली. दुपारच्या सत्रात कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील प्रा.डाॅ.संदीप राजपूत , श्री आकाश साळवे, श्री चांगदेव दातीर यांनी पी.एफ.एम.एस बाबत मार्गदर्शन केले तसेच ऑनलाईन द्वारे राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे पुणे येथील विभागीय संचालक श्री अजय शिंदे व राज्याचे संपर्क प्रमुख मंत्रालय मुंबईचे डाॅ निलेश पाठक ,तसेच लेखाधिकारी मंत्रालय मुंबई येथील सौ.वर्षा जाधव यांनी प्रशिक्षणार्थींना अनुदान व त्याचे वाटप कसे करावे? तसेच पी.एफ.एम.एस.संबधी उपस्थितांना येणा-या समस्यांचेही निराकरण करून मार्गदर्शनही केले .

 

            या प्रशिक्षणासाठी दहा जिल्ह्यातील 60 कार्यक्रम अधिकारी व लिपिक उपस्थित होते.आभार कृषी महाविद्यालय सोनईचे कार्यक्रम अधिकारी डाॅ.संदीप तांबे यांनी मानले .