महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्टॉलला बारामती येथील कृषिक 2024 प्रदर्शनास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्टॉलला बारामती येथील कृषिक 2024 प्रदर्शनास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या स्टॉलला बारामती येथील कृषिक २०२४ प्रदर्शनास शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद*

*राहुरी विद्यापीठ, दि. 21 जानेवारी, 2024*

 

        महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा बारामती येथील दि. १८ ते २२ जानेवारी, २०२४ दरम्यान आयोजीत कृषिक २०२४ कृषि प्रदर्शनात सहभाग घेऊन जागतिक बँक अर्थसाहित, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पाने तयार केलेले नाविन्यपूर्ण अविष्कार प्रदर्शित केले असून या प्रात्यक्षिकांना शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुरी कृषि विद्यापीठाच्या या प्रदर्शन स्टॉलला मा. रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ, मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली. विद्यापीठाने उभारलेल्या या प्रदर्शनात व ड्रोन, ऑटो पी.आय.एस., स्मार्ट पी.आय.एस. स्वंयचलीत पंप प्रणाली, अद्ययावत हवामान केंद्र आणि सेंसर आधारीत सिंचन प्रणाली या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. डॉ .दगडू पारधे, इंजि. अभिषेक दातीर, इंजि. शुभम सिंग, अजिंक्य आढाव यांनी मान्यवरांना व उपस्थित शेतकर्यांना या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. 

         सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, प्राध्यापक डॉ. मुकुंद शिंदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले.