पुणे येथील बजाज फायनन्स कंपनीच्या मॅनेजरच्या जासास कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
राहुरी ता प्रति - डॉ देवेंद्र शिंदे

विमाननगर येथील बजाज फायनान्स कंपनीतील वरिष्ठ साहेबांच्या त्रासाला कंटाळून कोल्हार येथील इसमाची आत्महत्या.
मयत राहुल पुजारी वय 38 हे विमाननगर पुणे येथील बजाज फायनान्स कंपनीच्या विमाननगर शाखेत कार्यरत होते. काही दिवसापूर्वी त्यांचे प्रमोशन झाले होते परंतु ज्या शाखेत ते कार्यरत होते त्या शाखेतील वरिष्ठ अधिकारी के.के. केणी यांनी त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यानंतर राहुल पुजारी यांनी त्यांना सांगितले देखील साहेब मला हे काम जमणार नाही मला दुसरे काम द्या तेव्हा के. के. केणी या साहेबांनी पुजारी यांना काम जमत असेल तर कर नाहीतर कामाचा राजीनामा देऊन टाक आणि घरी जा असे उत्तर दिले. त्यानंतर काही दिवस राहुल पुजारी हे अत्यवस्थ आणि टेन्शन मध्ये राहू लागले या विषयी त्यांनी पत्नी मयुरीला देखील या बाबतीत कळवले
परंतु के. के. केणी या साहेबांचा दबाव व कामावरुन काढुन टाकु अशा धमक्या आणि वेळोवेळी मानसिक त्रास.दिला या कारणाने राहुल केणी यांनी दिनांक १७/०१/२०२६ रोजी त्याच्या राहत्या घरात (वाघोली पुणे) येथे फाशी घेतली. आणि आपली जीवनयात्रा संपवली
त्यांच्या या आत्महत्ये मुळे त्यांच्या पत्नी व आई वडिलांना योग्य तो न्याय मिळावा. या साठी आज दिनांक 20 जानेवारी रोजी बजाज फायनान्स शाखा राहुरी येथे अंदोलन करण्यात आले
राहुल पुजारी यांच्या पत्नी मयूरी पुजारी यांनी विमाननगर येथील के.के.केनी साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करावा व बजाज फायनान्स कंपनीने माझ्या व माझ्या कुटुंबाला न्याय मिळुन द्यावा व माझ्या लहान लहान मुलांना बालसंगोपनासाठी कंपनीमार्फत सर्व जबाबदारी कंपनीचे स्वीकारावी असे निवेदन राहुरी येथील बजाज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दिले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधने. सुभाष पुजारी. अजय कदम. प्रसाद पुजारी. अजित गायकवाड. सोपान पुजारी. या सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांनी राहुरी मधील बजाज फायनान्स कंपनीचे ऑफिस बंद करून निषेध दर्शवला व पुजारी कुटुंबाला न्याय न मिळाल्यास पुढील काळात राज्यातील बजाज फायनान्स कंपनीचे सर्व ऑफिस बंद करण्याचे आव्हाहन केले आहे








