राहुरी तालुक्यामध्ये तायक्वांदो प्रमोशन बेल्ट परीक्षा संपन्न,केशर उद्योग समूहाचे जनरल सेक्रेटरी मा.श्री .सागर दादा तनपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बेल्ट वितरित .

राहुरी तालुक्यामध्ये तायक्वांदो प्रमोशन बेल्ट परीक्षा संपन्न,केशर उद्योग समूहाचे जनरल सेक्रेटरी मा.श्री .सागर दादा तनपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बेल्ट वितरित .

राहुरी तालुक्यामध्ये प्रथमच राहुरी तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या वतीने व अहमदनगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या मान्यतेने राहुरी केशररंग मंगल कार्यालय येथे तायक्वांदो प्रमोशन बेल्ट परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक : 03/07/2022 रोजी करण्यात आले होते .राहुरी तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या 57 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून अतिशय उत्तमरीत्या वेगवेगळ्या बेल्ट टेस्ट पूर्ण करून अकॅडमीचे नावलौकिक केले आहे .

 

 

          राहुरी तालुका अकॅडमीचे कोच राष्ट्रीय पंच श्री . बाबासाहेब क्षिरसागर हे राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना तायक्वांदो प्रशिक्षण मिळावे यासाठी सतत प्रयत्न करत आहेत .या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नक्कीच फायदा होणार आहे .विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी मुलींची संख्या जास्त आहे . केशररंग कार्यालय येथे पार पडलेल्या परीक्षेमधील विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले थरारक प्रयोग पाहून अध्यक्षही भारावून गेले आहेत .श्री बाबासाहेब शिरसागर सरांच्या या उल्लेखनिय कार्याबद्दल तालुक्या मध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे .  

 

 

         श्री बाबासाहेब शिरसागर यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेस अहमदनगरचे कोच श्री .अल्ताफ कडकाले सर,संगमनेर येथील कोच श्री. लक्ष्मण शिंदे सर तसेच बाबळेश्वर लोणी येथिल कोच श्री.दिनेश राजपूत सर हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केशर उद्योग समूहाचे जनरल सेक्रेटरी मा. श्री .सागर दादा तनपुरे यांनी अध्यक्षस्थान भूषवून या कार्यक्रमाची शोभा वाढविली तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते प्रमोशन बेल्टचे वितरण करण्यात आले .यावेळी तायक्वांदो अकॅडमी व विद्यार्थ्यांना वेळोवेळी लागणारी मदत पुरविण्याचे काम केशव उद्योग समूह नेहमी करत राहील असे आश्वासन या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .सागर दादा तनपुरे यांनी देऊन सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत .याप्रसंगी श्री .संदीप भालेकर सर, श्री .ससाने सर, मेजर श्री .कराळे सर, शिंदे सर, कोकाटे सर, श्री .परजणे सर, श्री .लोखंडे सर व श्री .अशोक घोडके सर उपस्थित होते .