कला- वाणिज्य व विज्ञान महाविद्याल सोनई चे माजी विद्यार्थी जयेश साळवे यांना वनस्पती शास्त्रात पी.एच डी प्रदान .
खेडले परमानंद प्रतिनिधी //संभाजी शिंदे
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जयेश ताराचंद साळवे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 'वनस्पतीशास्त्र' (Botany) विषयात पीएचडी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी "Anatomical and Molecular Characterisation of Genus Cyathocline Cass. (Asteraceae) From India" या अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वपूर्ण विषयावर हे सखोल संशोधन पूर्ण केले आहे.
हे यश संपादन करण्यासाठी त्यांना प्रा. डॉ.अशोक तुवर यांचे मोलाचे आणि कुशल मार्गदर्शन लाभले. प्रा. साळवे यांनी आपल्या अध्यापनाच्या कार्यात व्यस्त असतानाही, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे संशोधनात्मक कार्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात नवीन माहिती समोर येण्यास मदत होणार आहे. साळवे हे सध्या प्रताप कॉलेज अंमळनेर जि. जळगाव येथे प्राध्यापक म्हणून अध्यापन करतात.
प्रा. जयेश साळवे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख मा.आ शंकरराव गडाख,मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख उपाध्यक्ष उदयन गडाख ,सचिव उत्तमराव लोंढे ,सह सचिव विनानक देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कल्हापूरे सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि विद्यार्थी वर्गाकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.








