नेवासा तालुक्यातील ऑनलाईन रेशनकार्ड मधील सावळा गोंधळ Delhi91 News चे पत्रकार संभाजी शिंदे यांनी आणला चव्हाट्यावर .
नेवासा तालुक्यातील ऑनलाइन रेशनकार्ड मधील सावळा गोंधळ दिल्ली 91 न्यूज पत्रकार संभाजी शिंदे यांनी आणला चव्हाट्यावर.
Delhi91 News ची खास बातमी .
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील गेल्या दहा वर्षापासून नव्याने रेशन कार्ड ऑनलाइन प्रक्रियेत असलेल्या रेशन कार्डधारकांना गरजवंत गरीब कुटुंबाला रेशन मिळत नसल्याने गेल्या दहा वर्षापासून ऑनलाईनचा सावळा गोंधळ सुरू आहे . त्यामुळे गरीब कुटुंबाला रेशन पासून वंचीत राहव लागत आहे . याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित यंत्रणेतील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का ? हा मोठा प्रश्न आहे .ऑनलाइनच्या नावाखाली गरीब कुटुंबाची सरळ सरळ फसवणूक सुरू असून याला कुठेतरी पाय बंद घालायला हवा . तलाठी , स्वस्त धान्य दुकानदार व तालुका पुरवठा विभाग यांचा सावळा गोंधळ संबंधिताचे रेकॉर्ड चेक केल्यानंतर चव्हाट्यावर आले आहे .
सन 2007 पासून मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी न केल्यामुळे नवीन प्रक्रियेत असलेल्या गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देत नसल्याची तक्रार खेडले येथील ग्रामस्थांनी दिल्ली नाईन्टी वन न्यूज चे पत्रकार संभाजी शिंदे यांना दिली व त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.ऑनलाइनच्या प्रक्रियेला जे कोणी दोषी अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे .रेकॉर्ड दुरुस्तीचे काम कोणाचे आहे त्यांनी दिरंगाई केलेली असल्याने त्यांना शासन झालेच पाहिजे .अशी मागणी खेडले परमानंद येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे .
रेशन कार्ड ऑनलाइनच्या नावाखाली सावळा गोंधळ सुरू असून महसूल यंत्रणेतील या गोंधळामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना केंद्र सरकार कडून मोफत धान्य मिळत असताना सुद्धा ते मध्येच कुठेतरी गायब केले जाते याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . महसूल यंत्रणेतील या प्रक्रियेमध्ये वेगळी यंत्रणा कार्यरत असल्याचा संशय येत असून याचा भांडाफोड झाला पाहिजे . महसूल यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी स्वस्त धान्य दुकानदार यांची मिली भगत असून गरिबाला मिळणाऱ्या धान्यावर लाभ उठवणारे बोके सोकलेले असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याने याला कुठेतरी आवर घालणे गरजेचे आहे .