पिंप्री अवघड येथे आ .प्राजक्त तनपूरे यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन व विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न .
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे तालुक्याचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून झालेल्या रस्त्याच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला .
पिंप्री अवघड येथे भूमिपूजन व सुमारे 95 लाख रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे .या कार्यक्रमाची जय्यत तयारी गावामध्ये करण्यात आली होती .आमदार प्राजक्ता तनपुरे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व डीजेवर राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या आवाजात ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांचे स्वागत केले .पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आमदार तनपुरे यांच्या हस्ते झाल्यानंतर त्या ठिकाणाहून अनेक कार्यकर्त्यांसमवेत आमदार तनपुरे पायी चालत झालेल्या कामांची पाहणी करत गावामध्ये आले .प्रथमत: त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले . गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून व्यासपीठावर विराजमान होताच विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले .
या लोकार्पण सोहळ्या निमित्त बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला .खोक्यांवर विराजमान झालेले सरकार हे खोक्यांवर भागले नाही म्हणून वसुली सरकार म्हणून प्रकाश झोतात आले आहे .गतिमान सरकारच्या नावाने जाहिरात करणारे हे सरकार गतिहीन झाले असून फक्त जाहिरात बाजी करण्याचे काम करत आहे .जनतेने सरकारची मानसिकता ओळखावी व आमचे सरकार येण्यास मदत करून विकास कामे करून घ्यावीत असे यावेळी आमदार तनपुरे ग्रामस्थांसमोर बोलत होते .
या कार्यक्रमाच्या वेळी उपसरपंच लहानु तमनर व राष्ट्रवादी तालुका युवाध्यक्ष श्रीकांत बाचकर यांनी गावात प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा पाढा आमदार तनपुरें समोर मांडला .तसेच गोपी लांबे यांनी गावातील ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराची पोल खोल सुरू करताच व्यासपीठावर एकच हास्यकल्लोळ सुरु झाला .राहिलेल्या विकास कामांना लवकरच गती देऊन काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन यावेळी आमदार तनपुरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे .तसेच जल जीवन मिशनचे काम व्यवस्थित रित्या करण्याच्या सूचना जलजीवन मिशनच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी आमदार तनपुरे यांनी दिल्या आहेत .
या कार्यक्रमा वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .भाऊसाहेब गटकळ हे होते .या कार्यक्रमासाठी राहुरी कारखान्याचे संचालक श्री .अर्जुन बाचकर,सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री.मच्छिंद्र लांबे,व्हाईस चेअरमन श्री. रवींद्र पवार, ग्रामपंचायत आजी -माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.