नेवासा तालुक्यातील शहापूर येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न संपन्न

नेवासा तालुक्यातील शहापूर येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न संपन्न

बालाजी देडगाव (प्रतिनीधी) नेवासा तालुक्यातील शहापूर येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .यावेळी तालुक्याचे महंत गुरुवर्य प्रकाश नंदगिरीजी महाराज यांची शहापूर ग्रामस्थांच्या वतीने रथामध्ये बसून टाळ ,मृदुंगाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजी मध्ये त्यांची गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी महिलांनी सडा,

रांगोळी व डोक्यावर कलश घेत महाराजांची स्वागताची जय्यत तयारी केली होती.

       यानंतर महाराजांच्या हस्ते भव्य हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या अश्वरूढ पुतळा असणाऱ्या शिवस्मारकाची आरती घेऊन विधिवत पूजा करण्यात आली .यावेळी महाराजांनी आपल्या वाणीतून छत्रपती शिवराय बद्दल अनमोल असे मार्गदर्शन करत हा सोहळा नाचून नाहीतर वाचून झाला पाहिजे हीच खरी सोहळ्याची शान आहे .अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला या शब्दांमध्ये शहापूर गावाचे कौतुक केले.

          यानंतर शिवचरित्रकार व्याख्याते ह भ प गणेश महाराज डोंगरे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते . गावातील लहान चिमुकल्या कलाकारांनी ही आपापली कला सादर करत छत्रपती शिवरायांवर मनोगत व्यक्त केली .व्याख्यान प्रसंगी शहापूर, देडगाव, देवगाव, फत्तेपूर, कवठा व आदी गावातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते..

      यानंतर शहापूर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची पंगत शिवजयंती निमित्ताने ठेवण्यात आली होती हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शहापूर ग्रामस्थ तरुण युवक मंडळ व महिला भगिनींनी ही या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.