महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या दुग्धशर्करा योगाने पिंप्रीकर सुखावले . छत्रपती शिवरायामुळेच आज मी किर्तनासाठी उभा आहे , ह.भ.प. - नारायण महाराज शिरवत .
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे गुरुवार दिनांक 16 फेबुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्र उत्सवानिमित्त शिवलिला अमृत पारायण सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे .
19 फेब्रवारी हा दिवस पिंप्रीकरांसाठी दुग्धशर्करा योगच घेऊन आल्याचे यावेळी दिसत होते .गावातील तरुणांनी एकत्र येऊन सकाळी 8 ते 10 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढली होती . ढोल, ताशे, लेझिम पथक आणि तोफांची आतिशबाजी या नयनरम्य सोहळ्याने संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते . गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनीही सोहळ्यात सहभागी होत या मिरवणूकिच्या सोहळ्यात भर घातली होती . महाराजांची मिरवणूक हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर महाराजांची आरती व जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्याचे चित्र यावेळी दिसून येते होते.
छात्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर महाशिवरात्री उत्सवातील काल्याच्या किर्तनाने गावातील सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले ते ह.भ.प. नारायण महाराज शिरवत यांनी . 10 ते 1 या वेळेमध्ये भगावन श्रीकृष्णाच्या रासलिला व छत्रपती शिवाजी महाराज यांचे थरारक प्रसंग सांगून व जयघोषाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणून महाराजांनी उपस्थितांची मने जिंकली . केवळ मी आज फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपेनेच किर्तनासाठी उभा आहे असे भावनिक उग्दारही यावेळी महाराजांनी काढले. काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसाद घेऊन दिवसभरात झालेल्या उत्कृष्ठ कार्यक्रमाची चर्चा प्रत्येक भाविक करतांना यावेळी दिसत होता.