आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी: जिहादी तेलंगणा येथून जेरबंद.

आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी: जिहादी तेलंगणा येथून जेरबंद.

आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी: आरोपी तेलंगणा येथून जेरबंद.

प्रतिनिधी - प्रसाद घोगरे - ९३७०३२८९४४.

स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांची यशस्वी कारवाई

दिनांक 02/07/2025 रोजी एका पीडित महिलेस इन्स्टाग्रामवरून अश्लील संदेश प्राप्त झाल्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 612/2025 अन्वये BNS कलम 78, IT Act कलम 67, 67A, तसेच POCSO Act कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याच दिवशी सुहास साहेबराव शिरसाठ यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून "संग्राम को दो दिन के अंदर खतम करुंगा" असा धमकीचा संदेश प्राप्त झाल्याबाबत गु.र.नं. 796/2025, BNS कलम 351(4) अन्वये आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष पथक गठीत करण्याचे आदेश दिले. पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनंत सालगुडे, अंमलदार फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव यांनी तपास कार्य सुरू केले.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्हे अनिस महंमद हनिफ शेख (वय 32), रा. चकलंबा, ता. गेवराई, जि. बीड याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा सध्या धग्गी, जि. निजामाबाद, तेलंगणा येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तेथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याने स्वतःच्या मोबाईलवरून संबंधित धमकीचा संदेश पाठविल्याचे मान्य केले. आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 612/2025 अंतर्गत पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.