श्रीरामपूर मध्ये गुन्हाशाखेची अवैद्य वाळू तस्कराविरुद्ध मोठी कारवाई..... कारवाई मध्ये 19 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाला सह 4 आरोपी ताब्यात.
श्रीरामपूर ::-- विविध मार्गाने प्रकाश झोतात येणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास वाळू व्यावसायिकाची विषयी गोपनीय माहिती मिळाली त्यामध्ये नायगाव शिवार तालुका श्रीरामपूर येथील गोदावरी नदी पात्रात ट्रॉलीसह 2 ट्रॅक्टर वाळू उपसा करून वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी पथकाने छापा टाकला असता दोन ट्रॅक्टर मजुरांच्या साह्याने वाळू भरत असताना मिळून आले. गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन ट्रॅक्टर चालक नामे 1) करण अशोक वाघ वय -20 राहणार - नायगाव, तालुका श्रीरामपूर,जिल्हा अहिल्यानगर, 2) अनिल नारायण आमले वय 24 राहणार - गोंडेगाव तालुका श्रीरामपूर,जिल्हा अहिल्यानगर. तसेच ट्रॅक्टर मालक नामे.. दत्तात्रय रावसाहेब पवार राहणार - गोंडेगाव, तालुका श्रीरामपूर,जिल्हा अहिल्यानगर,आदित्य काकासाहेब दिवे राहणार- गोंधवणी, वार्ड नंबर 1 तालुका श्रीरामपूर,जिल्हा अहिल्यानगर अशा व्यक्तींना ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता वाळू वाहतूक व उपसाबाबत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळून आले.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत ट्रॉलीसह 2 ट्रॅक्टर 2 मोटार सायकल असा 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदरील आरोपींना श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे हजर केले असून त्यांच्या विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 353/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 330 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक मा.वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर चे विभागीय पोलीस अधिकारी माननीय बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हाशाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोलीस ठाणे अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,अशोक लिपणे,संदीप दरंदले,रामजी जाधव, आकाश काळे, रमीजराजा आतार यांनी केली.








