श्रीरामपूरमध्ये 11 जुलै ला मोफत दिव्यांग कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप व मोफत वितरण शिबिर
*श्रीरामपूर* - भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंमको) कानपूर,एस.आर.ट्रस्ट,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय अहिल्यानगर,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर, मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मूकबधिर विद्यालय, गायत्री मंदिराजवळ,अशोक टॉकीज समोर,बेलापूर रोड,या ठिकाणी दिव्यांग कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप व मोफत वितरण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.अशी माहिती प्रमुख संयोजक मूकबधिर विद्यालयाचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे व मुख्याध्यापक संतोष जोशी यांनी दिली आहे.
डॉ सुजय विखे अध्यक्ष जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिरामध्ये अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन तात्काळ मोफत वितरण करण्यात येणार आहे. तरी अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तीनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ.अभिजीत दिवटे, प्रकल्प समन्वयक डॉक्टर दीपक अनाप,रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सुरेश पा. बनकर, सचिव नारायणभाई पटेल, खजिनदार विनोद पाटणी, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी, वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी,महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष सुनील कानडे, खजिनदार संसाधना चुडीवाल, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे यांनी केले आहे.








