१९८५ ची आठवणीतील वारी, लेखन सूर्यभान आघाव .
प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद
पंढरपुर वारी विशेष रिपोर्ट.
सूर्यभान आघाव खेडले परमानंद तालुका नेवासा यांनी त्यांच्या जीवनातील वारीचा अनुभव कथन केला आहे.
१९८५ साली मी पंढरपूरच्या वारी ला निघालो .त्यावेळी मला मित्रमंडळींनी वेड्यात काढलं होतं .करणं त्यावेळी वारीचा तेवढा प्रसार प्रचार नव्हता . परंतु मी वारीला काही भाविक म्हणून जात नव्हतो.मला प्रत्येक क्षेत्रातील गोष्टीबद्दल कुतूहल आणि जाणून घेण्याचा छंद आहे मी तमाशे, सिनेमे, कथा, कीर्तन, सगळे पाहिले ऐकले . तसं दिडी वारकरी काय प्रकार आहे..याचा अनुभव घ्यावा वाटला म्हणून मी दिंडीला निघालो मित्रमंडळींनी बजावून सांगितलं ...जाताय तर जा पण माळ घालू नका.मी म्हणालो मी काय बावळट नाही माळ
घालायला आणि नेवासा ते पंढरपूर दिंडी प्रवासाला सुरुवात झाली . त्यावेळेला फक्त नेवासा व देवगड दोनच दिंद्या जायच्या .जे करतोय ते मनापासून करायचं या सवयी मुळे मी दिंडीच्या मागेपुढे न चालता दिंडी बरोबर सर्व प्रवास केला .दररोज भजन ऐकत चालणे , संध्याकाळी कीर्तन ऐकणे तेही आवर्जून पुढे बसून ऐकायचं असे करत करत १०-१२ दिवस वारकराच्या सहवासात ह.भ. प. राजाराम महाराज तुवर आणि ह. भ.प.रामकृष्ण महाराज काळे (गोनेगाव) यांच्या सहवासात १०-१२ दिवस गेले .आणि मनावर एक वेगळे संस्कार घडत गेले.शेवटचा मुकाम करकंम येथे झाला. पहाटे ४ वाजता निघालो संध्याकाळी ४ वाजता वारीला लागलो ६-च्या दरम्यान पत्रच्याशेड मधून बाहेर निघणार तेवढ्यात खूप मोठे वादळ आले सर्व पत्रे उडून गेले आम्ही ८-१० जन होतो सगळ्यांची चुकामूक झाली मी आणि राजाराम बाबा चिंताग्रस्त होऊन एका ठिकाणी बसलो मनातल्यामनात पांडुरंग एवढ्या २५० km येऊन तुझ दर्शन होतं नाहीये म्हणून खूप वाईट वाटत होतं परंतु आमच्याकडे एका psi ने बघितलं आणि त्याने हाक मारली ... ओ नगरकर चला ...मी त्याच्याशी बोलता समजले ते श्रीरामपूर dutie वर असतात .त्यांनी आम्हाला बारीत लाऊन दिलं आणि आमचं ८ वाजता दर्शन झालं परंतु मनात वाटू लागलं बाकीचे जोडीदार कुठे असतील दर्शन घेऊन गरुडखंबा पशी आलो तिथे सगळ्यांची भेट झाली.आणि संध्याकाळी मुकामास गेलो .समाधान आणि सुख काय असतं ते मनाने खऱ्या अर्थाने तेव्हा अनुभवले.मनात असंख्य विचार येऊ लागले ...आपल्याकडून खूप मोठे तप झाले २५० km पायी चालत आलो आणि आता माळ न घालता मागे जाणे योग्य वाटत नाही म्हणून माळ घालण्याचा विचार पक्का केला .सकाळी बाबा ना म्हटलो त्यावर बाबा म्हणाले भाऊ माळ टिकणार नाही घरचं वातावरण मला माहीत आहे .बाबा काही माळ घालेनात गुरुजी कडे गेल्यास गुरुजी देखील तेच म्हनाले परंतु मी हट्ट सोडला नाही ..शेवटी गुरुजी नी माळ घातली ....मनोमनी खूप बदल झाला परिवर्तन झाला .आहार, विहार, आचार, विचार सर्वच बदलल. म्हणून मी अश्या परिस्थितीत आज आपल्यासमोर दिसत आहे .काळे गुरुजी क्या हस्ते माळ घातली त्याच्या ट्रस्ट मध्ये माझी खजिनदार म्हणून नेमणूक झाली आहे .असा माझा दिंडी च अनुभव माझ्या जीवनाला वळण देणारा ठरला.
सूर्यभान पा. आघाव