राहुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई , फसवणूक प्रकरणी ग्रामपंचायत सरपंच व नेवासा कृषी मंडल अधिकाऱ्यासह इतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात...

राहुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई , फसवणूक प्रकरणी ग्रामपंचायत सरपंच व नेवासा कृषी मंडल अधिकाऱ्यासह इतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात...

खेडले परमानंद //प्रतिनिधी

सध्या राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात एकच खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे .शासकीय बनावट दस्तऐवज प्रकरण तयार करून जमिनी खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीतील दोन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . नीरज बोकील यांनी गजाआड केले तर बाकीचे आरोपी फरार झाले आहे.फरार आरोपींना तात्काळ अटक करून चांगली शिक्षा करावी अशी चर्चा डिग्रस ग्रामस्थांमध्ये सुरू असल्याचे दिसत आहे .

 

       राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे बनावट दस्तऐवज करून श्री.नाना तुकाराम पवार वय वर्षे ६५ यांचे वडिल नामे तुकाराम मुक्ताजी पवार यांच्या नावे असताना सिटी सर्वे नं . १६१ या ग्रामपंचायत डिग्रस हद्दीत असलेला प्लॉट बनावट वारस लावून त्याच्या कडून खरेदी करून घेतला.

त्या प्लॉटचे मुळ वारस चौघे जण असताना त्यास वारस दुसरीच महिला लावून ती जागा खरेदी करून घेतली . त्या प्रकारास जबाबदार आरोपी नं १) प्रमोद रंभाजी गावडे.२) योगेश दिलिप पवार.३) साखरबाई मुरलीधर पटारे. ४) राजु रावसाहेब भिंगारदे.५ ) पोपट गोपीनाथ बर्डे. ६ ) बाळू बापू भांड यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .या प्रकरणा मध्ये आजून काही आरोपी वाढण्याची दाट शक्यता असल्याचे स.पो.नि.श्री .निरज बोकील यांचे मत आहे. डिग्रस येथील घडलेल्या प्रकरणामुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असून अशी अनेक प्रकरणे समोर येण्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे .तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये अशी फसवणूक झालेली प्रकरणे हाताशी आल्यास बरेच झांगडगुत्ते उघड होण्याची शक्यता असून या प्रकरणा मुळे आनखी काही अधिकार्‍यांचा पडदा फाश होण्याची शक्यता असल्यामुळे त्याचाही बंदोबस्त करून न्याय मिळवून देण्याचे काम करू असे श्री .बोकील यांनी सांगीतले आहे.