कुलगुरू डॉ . पी . जी .पाटील वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्काराने सन्मानित .

कुलगुरू डॉ . पी . जी .पाटील वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्काराने सन्मानित .

*कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्काराने सन्मानीत*

*राहुरी विद्यापीठ, दि. 2 जुलै, 2023*

             महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना मुंबई येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानाच्या वतीने कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल वसंतराव नाईक यांच्या 110 व्या जन्मदिनी व कृषि दिनानिमित्त मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या या कार्यक्रमासाठी मुंबई येथील कृषि वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष व नवी दिल्ली येथील दक्षिण आशिया जैविक तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री श्री. मनोहर नाईक, आमदार श्री. इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बारवाले, सचिव श्री. दिपक पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार व प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

               

                याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना डॉ. चारुदत्त मायी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व रु. 51 हजार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पदवी, आयआयटी खरगपूर येथून एम.टेक व नागपूर येथील व्हीएनआयटी मधून आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. कुलगुरु पदाचा पदभार सांभळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील सीरकॉट संस्थेच्या संचालक पदाची व तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख ही महत्वाची पदे भुषवली आहेत .

                 कृषि क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना 30 वर्षांचा प्रदिर्घ अनुभव आहे. 4 पुस्तके, 199 संशोधनात्मक पेपर, तांत्रिक शिक्षणासंबंधीची 14 पुस्तकेे व 1 पेटंन्ट त्यांच्या नावावर जमा आहे. राहुरी कृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरु या पदावर कार्यरत असतांना विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. शेतकर्यांसाठी शिफारशीबरोबरच प्रत्येक पिकांचे नवनविन वाण तसेच शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. कास्ट प्रकल्प, सेंद्रिय शेती, पुणे येथील देशी गाय संशोधन व विकास प्रकल्प यासह अनेक प्रकल्पांचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. विस्तार कार्य प्रभावी होण्यासाठी विद्यापीठात लवकरच कम्युनिटी रेडिओ सुरु होत असून त्यामुळे विद्यापीठाचे संशोधन प्रभावी पध्दतीने शेतकर्यांपर्यंत पोहचणार आहे. डॉ. पाटील यांच्या राष्ट्रीय पातळीवरील शेती व तत्सम क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत त्यांना आत्तापर्यंत 6 वैयक्तिक व 9 सामाईक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.