नेवासा तालुक्यात भाजपच्या दोन गटात धुसफूस; अध्यक्षपदावर कोणत्या गटाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
नेवासा तालुक्यात भाजपच्या दोन गटात धुसफूस; अध्यक्षपदावर कोणत्या गटाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष
सोनई //वार्ताहर //
नेवासा तालुका भाजप अध्यक्षपदावर कोणत्या गटाचा समर्थक कार्यकर्त्याची वर्णी लागणार याकडे तालुका वाशीयांचे लक्ष लागले आहे नेमणुकीसाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे आणि नेवासा मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात संघर्ष उभा राहिल्याचे दिसत आहे. नेवासा भाजपमध्ये दोन गट पडले असून विठ्ठल लंघे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना आपल्या समर्थक कार्यकर्त्याची या पदावर वर्णी लागावी यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या निवडीवर एकमत होत नसल्याने बंडाळीची शक्यता व्यक्त होत आहे . त्यातच सोनई येथून पालकमंत्र्यांना आम्ही सांगतो तो अध्यक्ष करा असा मेसेज गेल्याने अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली आहे.
नेवासा अध्यक्षपदासाठी पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासमोर पंधरा दिवसांपूर्वी अनेकांनी मुलाखती दिल्या. नेवासाच्या मुलाखतीसाठी मात्र ठराविक कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आले तर जे इच्छुक आहेत त्यांना कोणताही निरोप दिला नाही. नव्यानेच जिल्हाध्यक्ष झालेले विठ्ठल लंघे यांनी नेवासातील कार्यकर्त्यांना अंधारात ठेवले. अशा कार्यकर्त्यांचा सूर आहे शिवाय माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना या मुलाखतीची कल्पनाच दिली नाही. त्यामुळे नेवासा भाजपात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. काहींनी तर थेट माधव भंडारी यांना फोन करून मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून पंचवीस तीस वर्षापासून काम करत असल्याने मला मुलाखतीला का बोलावले नाही असा थेट सवाल केल्याचे एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या आटिवर सांगितले.
चार दिवसांपूर्वी ऑनलाइन मतदान घेण्याचा पक्षाने फार्स केला. यात ऋषिकेश शेटे, माऊली पेचे, अंकुश काळे, कैलास दहातोंडे यांना अध्यक्षपदासाठी मतदान झाले. मात्र माजी तालुकाध्यक्ष माऊली पेचे यांना सर्वाधिक मते पडल्याची चर्चा आहे. माऊली पेचे यांना भाजपच्या विरोधी गटाकडून मोठ्या प्रमाणात मतदान टाकल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा गट पालकमंत्री विखे यांचे जवळीक असल्यानेच विखे सांगतील तोच अध्यक्ष नेवासात होणार आहे अशी चर्चा आहे. तालुक्यात मराठा ओबीसी हा मुद्दा पुढे आला विद्यमान तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांना प्रदेश पातळीवर कार्यकारिणीत घेतल्याने तालुका अध्यक्ष पद रिक्त आहे या पदासाठी पुन्हा ओबीसीच द्यावा अशी मागणी तालुका उपाध्यक्ष प्रमोद पेहेरे यांनी केले आहे. नेवासात ओबीसी संख्या 60 टक्केहून जास्त असल्याने ओबीसी समाजाला अध्यक्ष देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.
तालुक्यात नगर उत्तर दक्षिणचे जिल्हाध्यक्षपद नेवासाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना पालकमंत्र्याच्या कृपाशीर्वादाने मिळाले असताना नेवासा तालुक्यात मात्र भाजपमध्ये दोन गट पडले असल्याचे दिसत आहे . लंघे मुरकुटे आगामी विधानसभेसाठी इच्छुक असल्याने दोन्ही नेते आपला आपला गट वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच भाजपचे तालुकाध्यक्ष आपल्याकडे राहावे यासाठी लंघे मुरकुटे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या अंतर्गत कलहामुळे अध्यक्षपद बाळासाहेब मुरकुटे यांच्या गटाकडे की विठ्ठल लंघे गटाकडे यावरच पुढील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा जोरात आहे.