अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध कारवाई,13,37,961/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त,100 आरोपी ताब्यात, अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर .

अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध कारवाई,13,37,961/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त,100 आरोपी ताब्यात, अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर .

अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारु विरुध्द कारवाई,11,37,961/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 100 आरोपी ताब्यात.स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

 

             आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने राकेश ओला , पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि . दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. 

            नमुद आदेशाप्रमाणे पो .नि . दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे व वाहतुक करणा-या इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती. 

 

             स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दिनांक 30/03/2024 ते दिनांक 02/04/2024 या कालावधीमध्ये एकुण 95 गुन्हे दाखल करुन 100 आरोपींचे ताब्यातुन 11,37,961/- रुपये किमतीची देशी विदेशी व गावठी हातभट्टीची दारु व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.

 

              स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार आहे.पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे .

 

             सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर व प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.