अभिराज तांबे यांची (BSF )सीमा सुरक्षा दल मध्ये निवड झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार.
बालाजी देडगाव :-
(प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अभिराज लक्ष्मणराव तांबे यांची (border security force.) सीमा सुरक्षा दल मध्ये निवड झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा नवी पेठ येथे झाला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे( अण्णा )हे लाभले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडेश्वर तांबे यांनी केले. यावेळी बळीराजा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपले मनोगत व्यक्त करत अभिराज तांबे यांना भावी काळासाठी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी अभिराज तांबे यांनी आपण केलेला खर्च प्रवास खडतर प्रवास व घेतलेली मेहनत जर मनामध्ये ध्येय असेल तर नक्की यशाचे शिखर गाठता येते. व हा माझा सन्मान नसून माझ्या आई-वडिलांचा सन्मान आहे. नक्कीच या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मी सतत प्रयत्न करीन. यावेळी गावातील तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या सन्मान सोहळ्यासाठी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे मा चेअरमन बाबासाहेब मुंगसे माजी चेअरमन भानदास मुंगसे प्रगतशील बागातदार रामभाऊ काजळे, सूर्यभान सोनवणे भाऊसाहेब सोसायटी सचिव रामा तांबे पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे सोसायटीचे संचालक जनार्दन देशमुख, अशोकराव शेजुळ शरद तांबे राजेंद्र तांबे राजू एडके अशोक देशमुख व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध संघटनेच्या व शाखेच्या वतीने अभिराज तांबे व वडील लक्ष्मणराव तांबे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार लक्ष्मणराव पंढरीनाथ तांबे यांनी मानले.