अनेक गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार,पुनतगाव दरोड्यातील आरोपी नेवासा पोलिसांच्या जाळ्यात.

प्रतिनिधी:-नेवासा
नेवासा पोलिसांच्या बेधडक कारवायांमुळे गुन्हेगारांची चांगलीच तंतरली आहे.दरोडे व जबरी चोर्यांचे प्रमाण वाढल्यामुळे.या घटनांना वेळीच आवर घालण्यासाठी.पोलिसांनी एकामागोमाग अनेक कारवाया करून अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहेत.त्यापैकीच तालुक्यातील पुनतगाव येथील प्रसाद विठ्ठल वाकचौरे यांच्या घरावर दि.०५/०१/२०२२ रोजी दरोड्याची घटना घडली होती त्या मध्ये ३ तोळे सोने व रोख ऐवज चोरीस गेलेला होता सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात भा.द.वि.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी कृष्णा छगन भोसले यास पोलिसांनी अटक केली होती त्याच्याकडे अधिक तपास केला असता हा दरोडा १)नारायण छगन भोसले २)बॉक्सर नाऱ्या काळे ३)स्वस्तिक तेरुलाल चव्हाण ४)कॅलीस तेरुलाल चव्हाण यांनी मिळून केल्याचे तास्पस्ट निष्पन्न झाले होते.याच गुन्ह्याच तपासात नेवासा पोलीस असताना त्यांना गुन्ह्यातील आरोपी नारायण छगन भोसले हा नागफणी ता.नेवासा येथे आल्याची माहिती मिळाली त्यानंतर लगेचच पोसई.समाधान भाटेवाल,पो.ना.बबन तमनर,पो.कॉ.अंबादास गिते,यांनी नागफणी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला मात्र आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळू लागला पोलीस पथकाने शिताफीने त्याचा पाठलाग करून त्यास अटक केली आहे सदर आरोपीवर नेवासा पोलीस ठाण्यात यापूर्वी भादवी कलम ३९९,३९५,३९२,३७९,४५७,३८० प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.सादर कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल ,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे ,पो.नि.बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.